राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाची सुरक्षा टांगणीला लागली असुन भंडारदरा धरणाच्या भिंतीला पोलिसांचे सुरक्षाकवच दिले असले. तरी भंडारदरा धरणाच्या तळाशी असणाऱ्या भिंतीपर्यंत सहज प्रवेश करता येतो. अकोले तालुक्यातील पश्चिमेला १९२६ साली ब्रिटीशांनी भंडारदरा धरणाची निर्मिती केली. त्या काळापासुन ते आजपर्यंत भंडारदरा धरण आशिया खंडातील पहिले दगडी बांधकाम असणारे धरण समजले जाते. या धरणावर उत्तरेतील अकोले, संगमनेर, श्रीरामपुर, नेवासा, राहाता या तालुक्यातमध्ये हरितक्रांती झाली. (Bhandardara)
शेतकऱ्यांच्या शेतात पाणी खेळु लागले. त्यातच भंडारदरा धरणाच्या परिसराला निसर्गाची अविस्मरणीय अशी देणगी मिळालेली आहे. त्यामुळे भंडारदऱ्याचा निसर्ग पाहण्यासाठी कायमच निसर्गप्रेमी भंडारदऱ्याला भेट देतात. भंडारदरा धरणाच्या सुरक्षेसाठी अहमदनगर पोलिसांनी चार पोलिसांची नेमणुक केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व पोलिस कर्मचारी धरणाच्या भिंतीच्या संरक्षणासाठी नेमलेले आहेत. ही पोलिसांची संख्या काही वर्षापुर्वी आठ होती. त्यामुळे धरणाच्या बऱ्याच भागात सुरक्षा दिसुन येत होती. नेमलेले चारही पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी कमी पडत असून, भंडारदरा धरणाच्या भिंतीपेक्षा भंडारदरा धरणाच्या अगदी तळाशी काहीही न करता सहज प्रवेश करता येऊ शकतो.(Bhandardara)
Sarvteerth Taked | शेतकऱ्यांसाठी इकर्डा आणि बायफ संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत चर्चासत्र
सुरक्षेसाठी केवळ ४ पोलिस कर्मचारी
भंडारदरा धरणाच्या सुरक्षेसाठी अहमदनगर पोलिसांबरोबरच ठिकठिकाणी धरण शाखेचे कर्मचारी नेमलेले आहेत. पंरतु या कर्मचा-यांची संख्याही अतिशय तोकडी आहे. भंडारदरा धरणाच्या बगिच्यात दिवसपाळीला दोन तर रात्रपाळीला तीन असे कर्मचारी सुरक्षेसाठी नेमले आहेत. या कर्मचा-यांना कुणीही दमदाटी केली किंवा धाक जरी दिला तरी सहज धरणाच्या तळाशी असणाऱ्या भिंतीपर्यंत पोहचणे शक्य होणार आहे.(Bhandardara)
Taked | न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज येथे बारावीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
नव्याचे नऊ दिवस अशी अवस्था
गत चार ते पाच वर्षापुर्वी भंडारदरा धरणावर देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. नव्याचे नऊ दिवस अशी अवस्था या कॅमे-यांची झाली. जास्तीत जास्त सहा महिने कॅमे-यांनी तग धरला. नंतर हे कॅमेरे कुठे गायब झाले हे धरणाच्या अधिका-यांना सुद्धा माहीत नसावे. अनेकदा वर्तमानपत्रांनी बंद कॅमेऱ्याबाबत आवाज उठविला, तरी सुद्धा जलसंपदा विभागाला जाग आली नाही. आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखित आहात’ हा फलक मात्र रुबाबात भंडारदरा धरणाच्या भिंतीसह परिसरात झळकत आहे. अनेकदा या धरणाची राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडुन सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव पाहणी केली गेली.(Bhandardara)
या पाहणीत या सुरक्षा यंत्रणेनेही धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेवर ताशेरे ओढले. या धरणाची काही वर्षापुर्वी दहशतवाद्याकडुन टेहाळणी झाल्याची ऐकीव माहीती उपलब्ध होत आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रातत लाखो नागरीकांचे वास्तव्य आहे. धरणाची सुरक्षा जर ईतकी कुचकामी असेल तर लाखो नागरीकांचे जीव धोक्यात घालण्यासारखीच अवस्था आज भंडादरा धरणाच्या सुरक्षेची झाली आहे. आता तरी जलसंपदा विभाग सुरक्षेच्या कारणास्तव झोपेतुन जागे होणार का ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांमधुन विचारला जात आहे.(Bhandardara)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम