Skip to content

Chandwad | शिवजयंती निमित्त केदा आहेर यांच्या हस्ते वैद्यकीय साहित्याचे वाटप

Chandwad

Chandwad |  महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात १९ फेब्रुवारी रोजी तर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन कृष्ण तृतीया दिवशीचा असल्याने यंदा तिथीनुसार शिवजयंतीचा सोहळा 28 मार्च 2024 दिवशी साजरा करण्यात आला. अनेक शिवभक्त हे तिथीनुसार शिवजयंतीला देखील शिवनेरीवर मोठ्या संख्येने जाऊन आदरांजली अर्पण करतात.तर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरुवार (दि. २८) रोजी तिथीनुसार जयंती असून, यानिमित्ताने चांदवड येथे मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली.

Chandwad | राहुल आहेरांचा निधीसाठी सिक्सर; चांदवड-देवळासाठी १९२ कोटी मंजूर

यावेळी गरजू नागरिकांना हॉस्पिटल बेड, वॉकर, व्हीलचेअर, कमोड चेअर, कुबडी स्टीक, गादी आदी वैद्यकीय साहित्याचे शिवजयंती निमित्त भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दरम्यान, या कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर, चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलिवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, प्रशांत ठाकरे, तसेच स्थानिक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!