Skip to content

Lok Sabha Election | शिंदेंचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात..?

Lok Sabha Election

Lok Sabha Election |  शिवसेनेत उभी फुट पडली त्यावेळी १३ खासदार हे शिंदेंसोबत गेले होते. मात्र, आता लोकसभेच्या जागावाटपादरम्यान शिवसेनेच्या विद्यमान खासदार असलेल्या १३ जागाही शिवसेनेला मिळत नाहीये. नुकतेच शिंदे गटाच्या चार विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. यात यवतमाळ वाशिमच्या पाच टर्मच्या खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बहीण भावना गवळी यांचाही समावेश आहे. दरम्यान, ठाकरेंची साथ सोडून आम्ही तुमच्यासोबत आलो आणि आता आमच्याच जागांसाठी आम्हाला झगडावं लागत आहे. डावललं जात आहे, अशी भावना शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांची आहे. (Lok Sabha Election)

यातच आता शिंदे गटाचे संतापलेले खासदार मोठी निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते तथा कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे गटाचे सात खासदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे.  आधीच राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांच्या या दाव्यामुळे आता नवा ट्विस्ट आला आहे.  (Lok Sabha Election)

Dhule Lok Sabha | जातींमध्ये भांडणं लावली, कमिशन घेतले; ड्रायव्हरही करू शकतो भामरेंचा पराभव..?

Lok Sabha Election |  निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

दरम्यान, यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, “शिंदे गटाच्या ७ खासदारांची काय गती झाली आहे. उद्धव ठाकरे भेटत नव्हते असे म्हणणाऱ्यांना आता त्यांच्या जागाही भेटत नाही. त्यामुळे आता त्यातील निम्मे खासदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शिंदे व अजित पवार हे दोन्ही गट गोंधळलेले आहेत. भाजपचीही मोठी दमछाक होत असून, इंडिया आघाडी या टर्मला भाजपचे सत्तेचे स्वप्न हे धुळीस मिळवणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. (Lok Sabha Election)’

Kalyan Lok Sabha | श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून ‘या’ महिला उमेदवाराला संधी.?

तो मुद्दा फार वाढवायची गरज नाही

महाविकास आघाडीतही काही जागांवरून वाद सुरू असून, यात सांगलीच्या जागेवरुण जोरदार खडाजंगी सुरू आहे.  दरम्यान, या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून, यामुळे काँग्रेस नाराज आहे. याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, “सांगलीचा मुद्दा हा फार काही वाढवण्याची गरज नाही. ती जागा आधीपासून काँग्रेसचीच होती. सगळे वाद फार ताणायचे नाही. पक्षाच्या नेतृत्वाचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असल्याचेही यावेळी ते म्हणाले. (Lok Sabha Election)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!