Congress | २५ ‘गॅरंटींचा काँग्रेसचा जाहीरनामा; बघा काँग्रेस जनतेला काय काय देणार

0
2
Congress
Congress

Congress | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीकडून मपथि तयारी करण्यात आली असून, इंडिया आघाडीचा प्रमुख पक्ष काँग्रेसचेही जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसने दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षांसमवेत ‘लोकशाही बाचाओ रॅली’ आयोजित करण्यात आली होती. याद्वारे दिल्लीत इंडिया आघाडीने सत्ताधारी पक्षांवर टिका, आरोप केले आणि जोरदार शक्तिप्रदर्शनही केले. तर, काल राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळीही भव्य अशा रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. (Congress)

दरम्यान, यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, काँग्रेसचा हा जाहीरनामा पाच ‘न्याय’ व २५ ‘गॅरंटी’वर आधारित आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. (Congress)

Congress | इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांचाही काँग्रेसला रामराम..?

काँग्रेसच्या या जाहीरनाम्यात ३० लाख सरकारी नोकऱ्या व तरुणांना एका वर्षासाठी प्रशिक्षणार्थी कार्यक्रमांच्या अंतर्गत तब्बल १ लाख रुपये देणार, देशातील गरीब महिलांना १ लाख रुपये मदत दिली जाणार, अशी आश्वासनंही देण्यात आली आहे. जात जनगणना व आरक्षणाची ५० टक्के मर्यादा रद्द केली जाणार असल्याची गॅरंटीही काँग्रेसकडून देण्यात आली आहे. एवढंच नाहीतर, ‘किसान न्याय’ अंतर्गत, किमान आधारभूत किंमत, कर्जमाफी आयोगाची स्थापना व जीएसटी मुक्त शेती या सर्व बाबींना कायदेशीर मान्यता देण्याचेही आश्वासन दिले आहे. तसेच भारतीय सेना दलाची ‘अग्निवीर योजना’ बंद करून जुनी ‘भरती योजना’ सुरू करण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. (Congress)

Congress | असा आहे काँग्रेसचा जाहीरनामा 

  • तरुणांना ३० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील.
  • युवा स्टार्टअप फंड हा रु. ५००० कोटी करण्यात येईल.
  • युवा वर्ग केंद्रस्थानी असेल
  • बेरोजगार भत्ता यासारख्या योजनांमध्ये चांगली रक्कम दिली जाईल आणि तेही पैसे थेट खात्यात जमा केले जातील.
  • शैक्षणिक कर्जावरील व्याजदरामध्ये सवलत देण्यात येईल.
  • अग्निवीर योजना बंद करून त्याऐवजी जुनी भरती योजना सुरू केली जाणार
  • पेपरफुटी थांबवण्यासाठी कठोर शिक्षा, जगातील यशस्वी तंत्र वापरले जाणार. (Congress)
  • ‘गृहलक्ष्मी’ यासारख्या योजनांपेक्षा अधिक पैसे हे थेट महिलांच्या खात्यात जमा होणार.
  •  गॅस सिलिंडर ४५० रुपयांना मिळणार.
  • बस प्रवासात सवलत मिळणार.

Maharashtra Congress | ज्यांना पक्ष सोडून जायचंय, त्यांनी लवकर जावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला

  • शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीऐवजी एमएसपी हमी देणार.
  • शेतकऱ्यांच्या उपकरणांवरून जीएसटी काढले जाणार.
  • महागाईपासून देशातील नागरिकांची सुटका करण्यात येणार
  • पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार
  • जात जनगणना व त्याआधारावर आरक्षण देणार (Congress)
  • आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा ही हटवणार
  • ‘न्याय’ योजनेच्या धर्तीवर गरीब कुटुंबांना प्रतिवर्षी ७२ हजार रुपये देणार
  • रेल्वे भाडे कमी करणार. ज्येष्ठ नागरिकांना सवलत, डायनॅमिक फेअर यासारख्या योजना बंद करणार
  • रेल्वेचे खाजगीकरण होऊ देणार नाही
  • देशभरात आठ कोटी ‘हमी कार्ड’ चे वितरण करण्यासाठी ३ एप्रिलपासून प्रत्येक घरी जावून हमी अभियान सुरू केले.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here