Sharad Pawar | शरद पवारांनी नगर जिल्ह्याचे सर्वात जास्त वाटोळं केलं..?

0
38
Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar |  सध्या राज्यात लोकसभा निवडणुकींची धूम सुरू असून, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांनी प्रचाराचे रान उठवले आहे. दरम्यान, नगरमध्ये विद्यमान भाजप खासदार सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात लढत रंगली आहे. यात आता उडी मारलीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी, नगर जिल्ह्याचे सर्वात जास्त नुकसान कोणी केल असेल तर ते शरद पवारांनी. जिल्ह्यात भांडणं लावायची ही त्यांची अनेक वर्षांची परंपरा असल्याची घणाघाती टिका विखे पाटलांनी केली आहे. (Sharad Pawar)

महायुतीच्या कार्यालयाचे उद्घाटन आज नगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी शरद पवारांवर राधाकृष्ण विखे पाटलांनी ही टीका केली. यावेळी विखे पाटील म्हणाले की, “नगरमधून विखेंना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला असून, त्यासाठी नगर जिल्ह्यातील असंतृष्ट लोकांची त्यांनी मोट बांधायची आणि त्या लोकांना शिमगा करायला लावायचा” असा खोचक टोला त्यांनी पवारांना यावेळी लगावला. (Sharad Pawar)

Sharad Pawar | शरद पवारांची ताकद वाढणार; ;’हा’ आमदार राजीनामा देणार..?

Sharad Pawar | पवारांचे योगदानच काय आहे?

दरम्यान यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “पवारांचे अहमदनगर जिल्ह्यात योगदानच काय आहे? तर एक आयात केलेला उमेदवार उभा करून तुम्हाला नगरमध्ये निवडणूक लढवायची आहे. मात्र जिल्ह्यातील जनता ही दूधखुळी नाही. तुमचे सर्व मनसुबे हे जनतेने मागीलवेळी धुळीस मिळवले होते. यावेळीही पुन्हा महायुतीचा उमेदवार हाच मताधिक्यानेच निवडून येईल आणि तेच उत्तर हे पवारांच्या कर्तुत्वाला योग्य असेल. (Sharad Pawar)

विखे पाटलांचे शरद पवारांना आव्हान

आजपर्यंत नगर जिल्ह्याचे सर्वात जास्त वाटोळ हे जर कोणी केले असेल तर ते शरद पवारांनी केले आहे. जिल्ह्यात भांडणं लावायची ही शरद पवारांची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. तसेच नगर जिल्ह्यासाठी शरद पवारांनी आजपर्यंत काय केलं याचा खुलासा त्यांनी करावा, असे आव्हानही त्यांनी यावेळे दिले आहे.(Sharad Pawar)

Sharad Pawar | शरद पवारांची मोठी घोषणा; ‘मी यापुढे कधीही…’

निलेश लंके ठेकेदार, त्यांचा बंदोबस्त करावाच लागेल..?

आठ महिन्यापूर्वीच अजित पवारांसोबत गेलेला उमेदवार हा त्यांना सोडू शकतो तर तो या जनतेलाही सोडू शकतो. सुपा एमआयडीसी ही काही लोकांनी ठेकेदारीसाठी वापरली. हे सर्व ठेकेदार असून त्यांचा बंदोबस्त हा करावाच लागेल, अशी टिका त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर केली आहे.  (Sharad Pawar)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here