Nashik Loksabha | महायुतीत लोकसभेच्या जागावाटपावरुन आधीच खडाजंगी सुरू असून, यात शिंदे गटाच्या चार विद्यमान खासदारांचे तिकीट कापले गेले आहे. मात्र, अजूनही नाशिकच्या जागेचा तिढा हा कायम आहे. या जागेवरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये बिनसले असून, या जागेवर अजित पवार गटाचे छगन भुजबळ, शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि जिल्ह्यातील भाजप नेतेही आग्रही आहेत. सर्वच इच्छुक उमेदवार नाशिकची जागा आपल्याच पक्षाची असल्यावर ठाम आहेत. (Nashik Loksabha)
नाशिकची जागा ही शिवसेनेची पारंपरिक जागा आहे. आमचा येथे २ टर्मचा खासदार आहे. त्यामुळे ही जागा आमचीच असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. तर, नाशिक लोकसभा मतदार संघातील ६ पैकी ३ विधानसभांवर भाजपचेच आमदार आणि नगरसेवक आहेत. त्यामुळे येथे भाजपची ताकद अधिक असून, ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी स्थानिक भाजप नेते आग्रही आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करत आपल्या नावावर थेट दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्याचा दावा भुजबळांनी केला आहे. यातच आता नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनीही नाशिकची जागा ही शिवसेनेचीच असल्याचा दावा केला आहे. (Nashik Loksabha)
Nashik Loksabha | दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ; नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी
Nashik Loksabha | काय म्हणाले दादा भुसे..?
दरम्यान, यावेळी मंत्री दादा भुसे म्हणाले की, “नाशिक लोकसभा मतदार संघाची स्टँन्डींग जागा ही शिवसेनेची आहे. नैसर्गिकरित्या ही जागा आम्हालाच मिळायला पाहिजे हा आमचा दावा कायम आहे आणि या क्षणालाही आमचा हा दावा आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून मतदारसंघात चांगली कामे झाली आहेत. त्यामुळे महायुतीचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील, त्या दृष्टीने मार्गक्रमण करणे हे सर्व शिवसैनिकांच काम आहे, असे मंत्री भुसे म्हणाले. (Nashik Loksabha)
Nashik Loksabha | आचारसंहिता भंगाची पहिलीच तक्रार विद्यमान खासदारांच्या नावे
आम्ही एक दिलाने काम करणार
लोकशाही पद्धतीत काही गोष्टी या मागे पुढे होतात. काही भागात स्थानिक बाबी या लक्षात घेऊन बदल करावा लागतो. मात्र बहुतेक ठिकाणी विद्यमान खासदार हेच आहेत. महायुतीत सर्वांचे विचार एक असून, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे एकत्र चर्चा करत आहेत. आरपीआय गट हा महायुतीचाच एक भाग आहे. यासाठी आम्ही एक दिलाने काम करणार आहोत. खासदार रामदास आठवलेंना वरिष्ठ पातळीवर सन्मान दिला जाईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचेही यावेळी दादा भुसे यांनी म्हटले आहे. (Nashik Loksabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम