Loksabha Election | पारावर वाचले जाताय खासदारांच्या कामांचे पाढे 

0
16
Loksabha Election
Loksabha Election

राम शिंदे : प्रतिनिधी – सर्वतीर्थ टाकेद | देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, या पार्श्वभूमीवर आता गावगाड्यातील राजकारण तापू लागले आहे. निवडणुकीचे वातावरण तयार व्हायला लागले असून, उमेदवार आणि इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्तेही सज्ज झाले आहेत. चौकाचौकांत, कट्टया कट्ट्यावर, एसटी प्रवासात, गावातील पारावरही सर्वत्र निवडणुकीचीच चर्चा सुरू आहे. मतदारसंघात उमेदवार कोणीही उभे राहो अन् कोणीही निवडून येवो. आपल्याला कोण नाही, अशी कुजबुज मतदारांमध्ये निवडणूक काळात सुरूच असते.

उमेदवार ‘आर या पार’चा पवित्रा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, होळीनंतरही कार्यकर्त्यांची राजकीय धुळवड ही सध्या ग्रामीण भागात सुरू आहे. दरम्यान, अद्याप काही ठिकाणांवरील उमेदवार जाहीर झाले नसल्याने निवडणुकीचा आखाडा अद्याप म्हणावा तसा रंगला नाही. लोकसभा निवडणुकीत बदललेली राजकीय समीकरणे, आरोप- प्रत्यारोपांमुळे ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाल्याने उमेदवारांनी त्यांच्या कार्यकत्यांनी आयुधे सज्ज केली आहेत.

Nashik Loksabha | हेमंत गोडसेंच्या तिकीटासाठी मंत्री दादा भुसे मैदानात

पारावर वाचले जाताय आमदार, खासदारांच्या कामांचे पाढे 

दरम्यान, ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक असल्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांना प्रचार करताना चांगलाच घाम फुटणार आहे. कडक उन्हाच्या तडाख्याचा उमेदवारांच्या प्रचाराला फटका बसणार असून, उमेदवार सकाळी व ऊन कमी असताना प्रचार करतानाचे चित्र दिसत आहे. एवढेच नाहीतर आपल्या नेत्याच्या प्रचारासाठी कार्यकर्ते खांद्यावर उपरणे टाकून गावोगावच्या खेटा करत आहे. नाशिक जिल्ह्यात ऐन मार्चमध्येच ३५ ते ४० अंश सेल्सिअसवर पारा पोहोचला असून, आता गावागावांत पारावर आपापल्या जिल्ह्याच्या राजकरणाच्या, उमेदवारांच्या आणि विद्यमान आमदार, खासदारांनी केलेल्या कामांचे पाढे वाचले जात आहे.

Loksabha Election | आमदारांना खसदारकीची संधी; काँग्रेसचे ‘हे’ उमेदवार निश्चित

Loksabha Election | नेत्यांची बाजू सावरताना कार्यकर्त्यांची बोबडी वळतेय

दोन्ही गोटातील बहुतेक जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली असून, त्या-त्या पक्षांचे कार्यकर्ते आपलाच नेता कसा ‘पॉवरफूल’ हे दाखविण्यासाठी विविध सोशल मिडियावर हवा करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत हा नवा ट्रेंड आला असून, प्रत्यक्षात जाऊन कामं सांगण्यापेक्षा सोशल मीडिया मंतदारणावर चांगला परभाव पाडत हे. त्यामुळे सर्वच उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध गाण्यांसह आपापल्या नेत्यांचे व्हीडियो शूट करायला सुरुवात केली असून, यामुळे प्रचाराचे रान हे सोशल मीडिया बनले आहे. विशेष म्हणजे आजवर राज्याच्या राजकारणात कधीही न झालेल्या अशा क्लिष्ट राजकीय समीकरणांमुळे आपआपल्या नेत्यांची पाठराखण करताना, प्रतिमा सुधारताना आणि बाजू सावरताना कार्यकर्त्यांची चांगलीच बोबडी वळताना दिसतेय, कारण ग्रामीण भागातील मतदार राजाही आता सुज्ञ झाला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here