Nashik | इंदिरानगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी संपवले जिवन; कारण अद्याप अस्पष्ट

0
19
#image_title

Nashik | काल संध्याकाळी शहरातील पाथर्डी परिसरात नांदूर रस्त्यावर वालदेवी नदीवर गणपती विसर्जना करिता गेले असता दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर आता शहरातील इंदिरानगर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सराफ लॉन्स भागात दांपत्याने आपल्या ९ वर्षीय मुलीसह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Nashik | मालेगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण

दाम्पत्याने मुली सोबत संपवले जीवन

विजय माणिकराव सहाने, ज्ञानेश्वरी विजय सहाने, अनन्या विजय सहाने अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे असून विजय एका कंपनीमध्ये कामगार होते व मागील काही दिवसांपासून त्यांची कंपनी बंद झाल्याची माहिती आहे. आज सकाळी आठच्या सुमारास आपली नात शाळेत जाण्यासाठी खाली आली नाही म्हणून माणिक सहाने यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दार ठोकूनही काहीच उत्तर न मिळाल्याने त्यांना शंका आली व त्यांनी लगेचच समोर राहणाऱ्या लोकांना मदतीसाठी बोलवले.

Nashik | अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांना ‘धर्मभूषण’ पुरस्कार प्रदान

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

त्यानंतर, दरवाजा तोडून खोलीमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना विजय, ज्ञानेश्वरी आणि अनन्या मृतअवस्थेत आढळले. त्यानंतर इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्या तिघांजवळही कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नसल्याकारणाने आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतर तिघांच्या मृत्यूचे कारण समोर येईल. त्यामुळे इंदिरानगर पोलिसात त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here