RSS | फुले, शाहू , आंबेडकरवादी संघटनांकडून सरसंघचालकांनी चुकीचा इतिहास सांगितल्याचे आरोप केले जात आहेत. रायगडावरील छत्रपती शिवरायांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शोधून काढल्याचे दस्तऐवज आहेत. तसे महात्मा फुलेंच्या दीनबंधू अंकात नमूदही केलेले आहे. तरीही ‘लोकमान्य टिळकांनी छत्रपतींची समाधी शोधून काढली.’ अशी चुकीची माहिती सांगितल्याचा गंभीर आरोप यावेळी या संघटनांकडून करण्यात आला आहे. तसेच बहुजन समाजाच्या खच्चीकरण्यासाठी संघाने हे पाऊल उचलल्याचा आरोप फुले, शाहू, आंबेडकरवादी संघटनांनी पत्रकार परिषदेत केला. त्याचबरोबर या विरोधात आवाज उठवत 18 सप्टेंबरला महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ निषेध नोंदवला जाणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
Political News | ‘…तर शिवसैनिक आत्महत्या करतील’; शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
संघ चुकीचा इतिहास सांगतोय
सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांनी पुण्यातील कार्यक्रमात छत्रपती शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढण्याचे सांगितले होते. त्यानंतर या नव्या वादाला चालना मिळाली असून 1869 मध्ये महात्मा फुले सर्वप्रथम रायगडावर गेले होते. त्यांनी तिथे समाधीचा शोध लावला. त्यावेळी बाळ गंगाधर टिळक 13 वर्षांचे होते. 1880 मध्ये पुणे आणि रायगडावर फुलेंनी शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली. 1993 मध्ये टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप दिले.
18 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन
सर्व इतिहास संशोधक, तज्ञ अभ्यासक, सत्यशोधक चळवळीचे दस्तऐवज, पोलीस खात्यांचे अहवाल, पुरावा लेखागाराची कागदपत्रे, इत्यादी पुरावे उपलब्ध असूनही चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेतून या संघटनांद्वारे करण्यात आला आहे. तेव्हा याविरुद्ध आवाज उठवित 18 सप्टेंबर रोजी महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत ॲड. अरुण मेत्रे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, प्रदीप वादाफळे, संजय यवतकर, बाळू निवल, सुनयना यवतकर, शशांक केंडे, विलास काळे इत्यादी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम