Sanjay Raut | ‘आमच्यामध्ये मतभेद नाहीत, पण दुमत असू शकत’; संजय राऊतांचे मोठे विधान

0
37
#image_title

Sanjay Raut | लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना संजय राऊतांकडून मोठं विधान करण्यात आलं आहे. “महाविकास आघाडीत सध्या जागावाटप सुरू असून, त्याबाबत आमच्या चर्चा सुरू आहेत. बैठकाही होत आहेत. आमच्यामध्ये कोणतेही भांडण नाही, कोणताही वाद देखील नाही. आमच्यामध्ये मतभेद नसले तरी दुमत असू शकत.” असं मोठं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना राऊतांनी हे विधान केले असून “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ही त्या काळाची महाविकास आघाडीची आणि राज्याची गरज होती.” असे देखील ते म्हणाले.

Sanjay Raut | पंतप्रधान पद नाकारल्याचा गडकरींचा दावा; संजय राऊतांनी केले मोठं वक्तव्य

“आमच्यामध्ये जागा वाटपावरून वाद आहेत, मतभेद आहेत” ही माहिती चुकीची असून मीडियातील बातम्या अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमची प्रत्येक जागेवर सहमती आहे. आम्ही जागा वाटपाबाबत व्यवस्थित चर्चा करत असून सीट टू सीट चर्चा सुरू आहे. इतक्या मोठ्या राज्यामध्ये एखाद्या जागेवरून मतभेद नाही, तर दुमत असू शकतं. अशा जागांवर नंतर चर्चा केली जाते, त्या फार नाहीत. एकंदरीत पाहायला गेल्यास आमच्याकडे जागा वाटपाबाबत एकमत अधिक आहे.” असे संजय राऊत म्हणाले.

“बंद खोलीतील चर्चा तुम्हाला का सांगायच्या?”- संजय राऊत

“सध्या आमची जागा कोणत्या आणि कशा पद्धतीने लढवायच्या यावर चर्चा सुरू असून जागा वाटपाबाबत बंद खोलीत चर्चा सुरू आहेत. तेव्हा बंद खोलीतील चर्चा तुम्हाला का सांगायच्या?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच “तीनही पक्षाचे नेते जागा वाटपावर संयमाने चर्चा करत असून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जागावाटप पूर्ण झालेले असेल.” असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर ‘जिंकेल त्याची जागा’ हे आमचे जागा वाटपाचे सूत्र असून मुंबईच्या जागांचं वाटप फार कठीण नाही. तेव्हा मुंबईचही जागावाटप लवकरच होईल. आता एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पराभव करणार.” असे देखील ते म्हणाले.

Dada Bhuse on Sanjay Raut | राऊत सर्वात मोठा डोमकावळा, घाबरतो का मी…; भुसेंचा राऊतांवर पलटवार

‘वन नेशन, वन इलेक्शन’ वरून भाजपवर साधला निशाणा

“निवडणुकीतील आर्थिक खर्च वाचवण्यासाठी ‘एकदेश, एक निवडणूक’ घेतली जात आहे. असे सांगण्यात येत आहे. या मुद्यावर बोलताना संजय राऊतांनी सरकारला धारेवर धरलं. “मोदी अर्थ पंडित केव्हा झाले? मोदींना अर्थशास्त्र केव्हापासून कळायला लागले? इतक्या वर्षात निवडणुका झाल्या, आपल्या पूर्वजांनी, घटनाकाराने काळजीपूर्वक तरतुदी केल्या आहेत. मोदींनी नवीन संविधान लिहू नये. हा भाजपचा राजकीय स्वार्थ आहे त्यामुळे भाजप भविष्यात राज्यात आणि लोकसभेत हरणार त्यासाठी हे फंडे वापरत असल्याचा” हल्ला यावेळी संजय राऊत यांनी केला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here