Nashik News | …अन्यथा नशिक महानगर पालिकेची ‘सिटीलिंक’ बंद पाडू

0
12
Nashik News
Nashik News

Nashik News |  शहरात नाशिक महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सिटीलिंक बससेवेतील बस चालक व वाहक नागरिकांशी असभ्य वागत असल्याने तसेच बस चालक वाहतुकीचे नियम न पाळता बेशिस्तीने बस चालवत असल्याने त्यांना शिस्त लावावी, असे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. सिटीलिंकचे व्यवस्थापकांना दिले.

नाशिक शहरात सिटीलिंकच्या माध्यमातून नाशिककरांसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु सिटीलिंकचे बस चालक हे बेशिस्तीने बस चालवत असून, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. बस रस्त्यावर चालवताना लेनची शिस्त न पाळता एकाच वेळी शेजारी शेजारी बस चालविणे, रस्त्यात बस थांबवून इतर वाहनचालकांना रस्ता न देणे, बस थांब्यावर व्यवस्थित बस न थांबविणे, बस थांब्यापासून दूर थांबवणे, वेगाने गाडी चालवून इतर वाहनांना ओवरटेक करणे, रस्त्यावरील इतर वाहनांना कट मारणे, दुचाकी चलकांना दाबणे असे सर्रास प्रकार सिटीलिंकचे चालक करत आहेत.(Nashik News)

Nashik News | नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

बस वाहक प्रवाशांसोबत अरेरावी करतात… 

त्यांच्या बेशिस्तपणामुळे शहरातील वाहतूक कोंडीत भर पडत आहेत. तसेच बस वाहक हे बस प्रवाशांसोबत अरेरावी करत असून सुट्टे पैसे करिता वाद घालणे, महिला वर्गासोबत असभ्य वागणे, गर्दीच्या वेळी अरेरावी करणे असे प्रकार प्रत्येक बसमध्ये घडत आहे. सिटीलिंकच्या ताफ्यातील बसमध्ये दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. नाशिक शहरातील नगरिकांकरीता सोयीच्या दृष्टीने बससेवा सुरू करण्यात आली असून, चालकांच्या वाढत्या बेशिस्तपणामुळे इतर वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.(Nashik News)

Nashik News | बसचालकांना शिस्त लावण्याची गरज

तसेच, या बसद्वारे शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरीय भागांमध्ये वाहतूक कोंडीत भर पडत असून, इतर वाहन चालकांना या कोंडीतून काढताना मार्ग काढताना नाकीनऊ येते. त्यामुळे बसचालकांना शिस्त लावण्याची गरज आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणे, मुख्य बाजारपेठा, शाळा-कॉलेज यामुळे आधीच येथील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी असते. त्यातच सिटीलिंकच्या बेशिस्त चालकांमुळे या मार्गांवर मोठी कोंडी होत आहे.

Nashik News | नाशिकमध्ये बबनराव घोलप यांनी ठाकरेंची साथ सोडली; ‘हे’आहे कारण..?

बेशिस्त वाहनचालकांवर करावी

एकंदरीत परिस्थिती बघता सिटीलिंक बससेवेतील सर्व वाहनचालक व वाहक यांना शिस्तीचे धडे देऊन बेशिस्त वाहनचालक व वाहकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी अमोल नाईक, मुकेश शेवाळे, डॉ. संदीप चव्हाण, विशाल डोखे, संदीप गांगुर्डे, दिपक पाटील, रामदास मेदगे, संदीप खैरे, राहुल पाठक, अक्षय पाटील, रविंद्र शिंदे, सागर मोरे, सौरभ राठोड, मंगेश दरोडे, किशोर पवार आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(Nashik News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here