सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | श्रीरामपूर (वाखारवाडी) विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉ. विश्राम निकम यांची तर व्हा. चेअरमन पदी वर्षा निकम यांची आज बुधवार (दि २८) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. देवळा येथील सहाय्य निबंधक कार्यालयात सोसायटीचे तत्कालीन चेअरमन परशराम निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रिक्त जागेसाठी चेअरमन पदी डॉ. विश्राम निकम यांची तर व्हा. चेअरमन पदी वर्षा निकम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
चेअरमन पदासाठी सूचक म्हणून रवींद्र निकम यांनी तर अनुमोदक म्हणून परशराम निकम यांनी स्वाक्षरी केली. तर व्हाइस चेअरमन पदासाठी सुचक म्हणून भारत गोसावी यांनी तर अनुमोदक म्हणून दत्तू निकम यांनी स्वाक्षरी केली
याप्रसंगी संचालक राजेंद्र निकम, दत्तू निकम, भारत गोसावी, सगुनाबाई अहिरे आदींसह सचिव विलास ठाकरे, कर्मचारी भाऊसाहेब निकम आदी उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम