सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील माळवाडी येथे महाशिवरात्री निमित्ताने शुक्रवार (दि. ८) मार्च पासून भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. (दि. ८) रोजी सकाळी ९ वाजता कलशपूजन, सायंकाळी ४ वाजता पालखी मिरवणूक रात्री ९ वाजता महिला दिनाचे औचित्य साधून ह.भ.प भारती गाडेकर, छत्रपती संभाजीनगर यांचे कीर्तन, शनिवार (दि. ९) रोजी ह.भ.प श्रावण महाराज, कुकाणे यांचे कीर्तन, रविवारी (दि. १०) रोजी ह.भ.प दिनेश महाराज, सुरत यांचे कीर्तन तर सोमवार (दि. ११) रोजी सकाळी ९ वाजता कीर्तन केसरी ह.भ.प संजय धोंडगे यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादने सोहळ्याची सांगता होईल. यासाठी माळवाडी, फुले माळवाडी येथील दानशूर व्यक्तींचे मोलाचे सहकार्य लाभले असून, भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाशिवरात्री उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.(Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम