Skip to content

Deola | परराज्यातील पोलिसांकडून देवळा येथील महिलेला रेल्वेत घडले माणुसकीचे दर्शन


सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | “सद्गरक्षणाय खलनिग्रहणाय “ह्या पोलीस खात्याच्या ब्रीद वाक्याची प्रचिती देवळा तालुक्यातील भाविकांना ‘आस्था ट्रेन’ मध्ये पहावयास मिळाल्याने त्यांनी मध्य प्रदेशच्या पोलिसांचे कौतुक केले. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, “आमदार डॉ राहुल आहेर यांच्या माध्यमातून देवळा तालुक्यातील भाविक आस्था ट्रेन ने अयोध्याला गेले होते. अयोध्यातून प्रभू रामाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू असतांना ट्रेन मधील देवळा येथील सफाई कर्मचारी महिला अनिता माळी या इटारसी स्टेशन वर अल्पोपहार खरेदी करण्यासाठी उतरले असतांना त्यांनी ५०० रुपये सदर दुकानदारास दिले व क्षणार्थात  ट्रेन सुरु झाली.

Deola | माळवाडी येथे महाशिवरात्री निमित्ताने भव्य कीर्तन सोहळा

धावपळीत त्यांनी रेल्वे गाठली. पण ह्या महिलेचे उर्वरित पैसे दुकानदाराकडेच राहिले. हा घटनाक्रम येथील किशोर चव्हाण, बंडू शेवाळकर व अन्य यात्रेकरूंनी यावेळी रेल्वे पोलिसांना सांगितला. तो पर्यंत दीडशे किलोमीटर ट्रेन पुढे आली होती. पण अवघ्या एक ते दिड तासांत संबंधित पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून घटनेचा इटारसी रेल्वे स्टेशनवर संपर्क करुन सदर महिलेचे शिल्लक पैसे पोलिसांनी फोन पे द्वारे मागवून गरीब महिलेला परत केले.

परराज्यातील पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन घडल्याने यावेळी महिलेच्या चेहऱ्यावर निखळ आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी रेल्वे तील सर्वांनीच पोलिसांच्या वर्दित देवदुत पाहिले. सर्वच उपस्थित प्रवाशांनी ह्या कामगिरीचे पोलिसांचे टाळ्या वाजवून कौतुक करून, कृतज्ञता व्यक्त केली. कायदा व सुव्यस्था राखणाऱ्या खाकी वर्दीला खऱ्या अर्थाने दाद द्यावी लागेल. ह्या घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, परराज्यातील पोलिसांचे ह्या माणुसकीच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!