Loksabha 2024 | नाशिक का खासदार कैसा हो, शांतीगिरी बाबा जैसा हो

0
4
Loksabha 2024
Loksabha 2024

Loksabha 2024 |  आगामी लोकसभा निवडणुकीची राज्याच्या राजकारणात जय्यत तयारी सुरू असून, लवकरच लोकसभा निवडणुकींची तारीख जाहीर होईल. राज्याच्या राजकारणात नाशिकचे राजकीय महत्त्व वाढले असून, या लोकसभेसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. आधीच या जागेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही खडाजंगी सुरू असून, यातच आता साधू महंतांनीही लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, जय बाबाजी भक्त परिवाराचे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी नशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ते स्वत: नाशिक लोकसभा मतदार संघातून लढवणार असून, राज्यातील एकूण आठ ठिकाणी ते उमेदवार देणार आहे. नशिक लोकसभेवर भाजपने दावा केला असून, आता शांतिगिरी महाराजांच्या या घोषणेमुळे भाजपासमोरचे आव्हान वाढले आहे.

Lok Sabha 2024 | विद्यमान खासदार आणि इच्छुक उमेदवारात केंद्रीय मंत्र्यांसमोर ‘तु तु मै मै’

लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा

महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज आणि त्यांचे जय बाबाजी भक्त परिवार हे “लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा” हे ब्रीद घेवून नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणात आपण उतरणार असून, नाशिक आणि दिंडोरी यासह महाराष्ट्रात आणखी आठ लोकसभा मतदार संघांमध्ये जय बाबाजी भक्त परिवाराचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत, असे महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी आज चांदवड येथील बैठकीत सांगितले. आम्ही हिंदू धर्माचा भगवा रंग परिधान केला आहे. केवळ भगवा ध्वज खांद्यावर घेतला नाही, अशी टीका त्यांनी हिंदुत्ववादी पक्षांचे नाव न घेता केली आहे.

नाशिक का खासदार कैसा हो, शांतीगिरी बाबा जैसा हो

आज चांदवड येथे जय बाबाजी भक्त परिवाराची बैठक पार पडली. याआधीही त्यांच्या उमेदवारीची चर्चा होती. मात्र, आता त्यांनी अधिकृत घोषणा केली आहे. नाशिक, दिंडोरी, धुळे, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, अहिल्यादेवी नगर आदी ठिकाणांवरील जय बाबाजी भक्त परिवाराच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख प्रचारकांची बैठक ही आज चांदवड येथे पार पडली. यावेळी शांतीगिरी महाराजांनी निवडणुकांबद्दल अधिकृत घोषणा केली. शांतीगिरी महाराज यांना भक्त परिवाराने पाठिंबा दिला. तसेच “नाशिक का खासदार कैसा हो, शांतीगिरी बाबा जैसा हो”, अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या.

Hemant Godse | काय सांगता..! नाशिकचे विद्यमान खासदार पुन्हा ठाकरे गटात परतणार..?

गोडसे आता निवडून येणार नाहीत

लोकसभेच्या जागा वाटपावर मुंबईत महायुतीची चर्चा झाली असून, यावेळी नाशिक लोकसभेच्या जागेवर भाजप नेते आणि नशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी दावा केला. नाशिक लोकसभेची जागा ही भाजपला मिळावी, अशी सर्वांची मागणी असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये भाजपची ताकद मोठी आहे. तसेच मागील १० वर्षात हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये काहीच काम केले नाही. तर, गोडसे यांना भाजपनेच निवडून आणलं होतं, मात्र आता ते निवडून येणार नाहीत, असेही दिनकर पाटील यावेळी म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here