Lok Sabha 2024 | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे राजकीय महत्त्व हे वाढले असून, त्यामुळे अनेक राजकीय नेते येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीमधीलच तिन्ही पक्षांना नाशिकची जागा हवी आहे आणि यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये आणि पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसले.
दरम्यान, नाशिकमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वेच्या व्हील शॉपचे उद्घाटन झाले. तर, कार्यक्रमानंतर उपस्थितांसामोरच नशिक लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये चांगलीच टोलेबाजी झाली. या चर्चेआधीच “नाशिक लोकसभेच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली होती. (Lok Sabha 2024)
जागा वाटपावरून दोन्ही गटांमध्ये वाद विवाद सुरू असून, याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असली तरी स्थानिक पातळीवर अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये जुंपली आहे. नाशिकचे राजकीय महत्त्व पाहता सर्वच पक्षांना ही जागा हवी आहे. यातच काल नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनीही नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचाच असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज पुन्हा नशिक लोकसभेच्या जागेचा सत्ताधारी गटातील वाद हा चव्हाट्यावर आला आहे.
Shantigiri Maharaj | शांतीगिरी महाराज नाशिकमधून लढवणार लोकसभा निवडणुक..?
Lok Sabha 2024 | नेमकं प्रकरण काय..?
नाशिकमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वेच्या व्हील शॉपचे उद्घाटन झाले. यानंतर दानवे यांनी मध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे रावसाहेब दानवे यांच्या भेटीसाठी आले आणि त्यांनी दानवे यांचे स्वागत केले. त्यानंतर फोटो काढताना भाजपचे नशिक लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी गोडसेंना “माझ्या वाटेत येऊ नका”, असा खोचक टोला लगावला आणि त्यांना आपल्या समोरून बाजूला केले. (Lok Sabha 2024)
दानवेंनाही टोलेबाजीचा मोह आवरला नाही
दरम्यान, या प्रसंगानंतर दानवे यांनीही या दोघांना टोला लगावला. यावेळी “या दोघांतील वाद मिटविण्यासाठी मलाच यावे लागेल”, असे ते म्हणाले. त्यामुळे याठिकाणी एकच हशा पिकला होता. नशिक लोकसभा मतदार संघातून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे टर्मला तिसऱ्यांदा ‘हॅटट्रिक’ करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपकडून नशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक असून, त्यांची जय्यत टायरीदेखील सुरू आहे. मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आता सत्ताधारी महायुतीतून कोणाला संधी दिली जाईल हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Lok Sabha 2024)
PM Narendra Modi | काय सांगता ! पंतप्रधान मोदी होणार नाशिकचे खासदार ?
मोठी घोषणा
तर, यावेळी रावसाहेब दानवे यांनी मोठी घोषणा केली असून, “नाशिकमध्ये व्हील शॉपचे आज उद्घाटन झाले असून, या व्हील शॉपमुळे रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच या वर्कशॉपमुळे फक्त नाशिकचाच नाही तर इतर भागाचाही फायदा होईल. रेल्वेच्या दृष्टीने नाशिक विभाग हा महत्वाचा असून, १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्या माध्यमातून नाशिकमध्ये ‘कोच फॅक्टरी’ उभारण्यात येणार आहे. यातून नवीन इंजिन बोगी, व जुन्या बोगीचे मेंटेनन्स देखील केले जाईल, अशी मोठी घोषणा यावेळी त्यांनी केली. (Lok Sabha 2024)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम