Deola | देवळा येथे स्वामी समर्थ केंद्रात आणि दुर्गा माता मंदिरात चोरट्यांचा डल्ला

0
2
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या स्वामी समर्थ व ग्रामदैवत दुर्गा माता मंदिरात रविवारी (दि. २५) रोजी पुन्हा चोरीचा प्रयत्न उघडकीस आला असून, शहरवासीयांनी देवळा पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. याठिकाणी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गुरुवारी (दि. ८) रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी स्वामी समर्थांची मूर्ती व दान पेटी फोडून त्यातील जवळपास पन्नास ते साठ हजार इतक्या रकमेचा पोबारा केला होता.

ही घटना ताजी असून, अजून त्याच प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तोच काल पुन्हा या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी शहरवासियांचे ग्रामदैवत असलेल्या दुर्गा माता मंदिरात गेटचे कुलूप तोडून दान पेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. तर स्वामी समर्थ केंद्रातील दान पेटी फोडून चोरट्यांनी पुन्हा डल्ला मारला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. पुन्हा एकदा शहरातील चोरी आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी देवळा पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

Deola | देवळा बाजार समितीचे माजी संचालक श्रीराम देवरे यांचे निधन

Deola | नेमकं प्रकरण काय..?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळा पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर कोलथी नदी काठावर असलेल्या देवळा शहरवासियांचे ग्रामदैवत दुर्गा माता व स्वामी समर्थ केंद्रात रविवारी रात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून दुर्गा माता मंदिरातील अतिशय सुरक्षितरित्या असलेली दान पेटी उचलून बाहेर काढून ती फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला

त्यानंतर ते येथून तर जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रात गेले आणि त्यांनी येथील दान पेटीचे कुलूप तोडून त्यातील रक्कम लंपास केली. अवघ्या पंधरा दिवसापूर्वीच ह्या दान पेटीतून जवळपास पन्नास हजार रुपये चोरले होते. तर दुर्गा माता मंदिरातील दान पेटी चोरट्यांना फोडता आली नसून, येथील मूर्ती जवळील समान अस्ताव्यस्त करण्यात आले आहे. तसेच मंदिराच्या पुजारींच्या खोलीमधील कपाट तोडले असून, तेथून एक सोन्याचा हार चोरीस गेल्याचे सांगितले जात आहे.

हा सर्व प्रकार आज सकाळी स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी किशोर आहेर हे येथे पूजा करण्यासाठी आले असता, त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर हा प्रकार त्यांनी दुर्गा माता मंदिराचे सेवेकरी राहुल वाघमारे यांना सांगितल्या नंतर अनेकांनी मंदिराकडे धाव घेऊन घडलेल्या प्रकारची पाहणी करून पोलिसांना कळविले. याठिकाणी सतत घडत असलेल्या चोऱ्या थांबता थांबत नसल्याने ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तर, पोलिसांनी चोरांचा मागोवा शोधण्यासाठी श्वान पथक पाचारण केले आहे.

Deola | सामान्य समाज घटकांपर्यंत वैद्यकीय सेवा अत्यल्प दरात पोचवण्यासाठी मविप्र अग्रेसर – देवराम मोगल

पोलिसांसमोर आव्हान 

देवळा शहरात वारंवार दुचाकी तसेच इतर छोट्या मोठ्या चोऱ्या होत असून, देवळा पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. मात्र, पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मंदिरात घडलेल्या प्रकाराने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून सतत घडत असलेल्या घटनांना आवर घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here