Skip to content

Nashik Loksabha | नाशिकची जागा शिवसेनेलाच; ‘या’ नावावर शिक्कामोर्तब..?

Nashik Loksabha

Nashik Loksabha |  गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून वाद सुरू होता. एकीकडे महाविकास आघडीचा उमेदवार जाहीर होऊन प्रचारालाही सुरुवात झाली. मात्र, दुसरीकडे अजूनही महायुतीकडून उमेदवाराचाच शोध सुरू आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि हे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हेदेखील उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र, गोडसेंना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला असून, भुजबळ यांना मराठा समाजाने कडाडून विरोध दर्शविला. त्यामुळे या दोघांच्या उमेदवारीला ब्रेक लावत. महायुतीने नवीन नावांची चाचपणी सुरू केली. यात भाजप आमदार राहुल ढिकले, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, आणि राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावांचा समावेश होता. (Nashik Loksabha)

दरम्यान, यापैकीच एका नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकची हि पारंपरिक जागा शिवसेनेलाच मिळणार असून, येथून एकनाथ शिंदेंचे शिलेदार मैदानात उतरणार आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहीती समोर आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजय बोरस्ते यांना बोलावून घेतले आहे. यामुळे आता अजय बोरस्ते हे ठाण्याला रवाना झाले आहेत. (Nashik Loksabha)

Nashik Lok Sabha | उद्या राष्ट्रवादी भुजबळांच्या नावाची घोषणा करणार..?

Nashik Loksabha | यामुळे बाकी उमेदवार बाद 

नाशिक लोकसभेच्या जागेवरून अनेक दिवसांपासून महायुतीत स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवरही वाद सुरू होता. तिन्ही पक्ष आणि पक्षांतील इच्छुक उमेदवार हे या जागेवर दावा करत होते. त्यामुळे ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार..? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. यापैकी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर दोन वेळा शक्तीप्रदर्शन केले. वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परंतु भाजपच्या सर्व्हेमध्ये ते फेल झाले आणि त्यांच्या नावाला स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनीही विरोध दर्शविला. यानंतर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आले. त्यांनी तर तिकीट मिळणार या आशेने बँकांचे कर्ज फेडलाही सुरुवात केली. मात्र, त्यांना ब्राह्मण महासंघ, पुरोहित संघ आणि सकल मराठा समाजाने उघड विरोध दर्शवला. त्यामुळे त्यांचे तिकीटही कापले गेले. (Nashik Loksabha)

अजय बोरस्तेच का..?

यानंतर नवीन सर्व्हेमध्ये अजय बोरस्ते यांच्या नावाचा समावेश होता. त्यांचा मतदार संघातील उत्तम जनसंपर्क, दांडगा अनुभव, कार्यकर्त्याचे उत्तम जाळे, शहरी मतदारांच्या ओळखीतील नाव,  या सर्व बाजू पाहता. तसेच ते शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख असल्याने पूर्ण जिल्ह्यात त्यांनी कार्यकर्ते जोडलेले आहेत. विशेष म्हणजे सिन्नरची सासुरवाडी असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या मतांचे विभाजनही यामुळे होऊ शकते. या सर्व बाबी पाहता अजय बोरस्ते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समोर आले आहे. (Nashik Loksabha)

Nashik Loksabha | हेमंत गोडसेंच्या तिकीटासाठी मंत्री दादा भुसे मैदानात

अजय बोरस्ते यांचा राजकीय प्रवास

अजय बोरस्ते यांची राजकीय कारकीर्द ही अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेपासून सुरू झाली. त्यानंतर ते भाजप युवा मोर्चात दाखल झाले. मात्र, यानंतर हिंदुहृदयसाम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर ते नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. शिवसेनेत महानगरप्रमुख, नाशिक महापालिकेत गटनेता, विरोधी पक्ष नेता ही पदे त्यांनी भूषविली. शिवसेनेत फुट पडल्यानंतर अजय बोसस्ते यांनी नाशिकचे २२ नगरसेवक आणि हजारो शिवसैनिकांसोबत एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचे ठरवले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. (Nashik Loksabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!