Skip to content

Jalgaon | उन्मेष पाटलांमुळे स्मिता वाघ यांचे जाहीर झालेले तिकीट कापणार..?

Jalgaon

Jalgaon |  महायुतीत सध्या अनेक ठिकाणी नाराजीनाट्य सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. धुळ्यात सुभाष भामरे यांना उमेदवारी दिल्याने भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नाशिकच्या जागेवर शिदे गट दावा करत असल्यामुळे भाजप नाराज आहे. नाशिकची जागा आपल्याकडे घ्यावी. यासाठी स्थानिक पदाधिकारी आग्रही आहेत. तर, जळगावमध्ये या नाराजीतून विद्यमान खासदारांनी  पक्षांतर केले.(Jalgaon)

जळगावमध्ये आपल्याला डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे नाराज होते. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. एवढंच नाहीतर, त्यांनी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांना सोबत घेऊन त्यांना भाजपच्या स्मिता वाघ यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून मैदानात उतरवले. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, हे भाजप उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे. आणि याचमुळे भाजपने स्मिता वाघ यांच्याऐवजी आता माजी खासदार ए. टी. पाटील यांच्या नावाची चाचपणी सुरू केली आहे. (Jalgaon)

Jalgaon | तू चिंता करू नकोस, तुला…; रक्षा खडसेंसाठी भाजपचे संकटमोचक मैदानात

Jalgaon | भाजप जळगावमध्ये धक्कातंत्र लागू करणार..?

दरम्यान, ए. टी. पाटील यांनी दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली असून, त्यामुळे भाजप जळगावमध्ये धक्कातंत्र लागू करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. असं झाल्यास या सलग दुसऱ्या टर्मला भाजपला जळगावात ऐनवेळी उमेदवार बदलावा लागेल. त्यामुळे आता याहीवेळी स्मिता वाघ यांचं तिकीट जाहीर करुन भाजप मागे घेणार का..? हे पहावे लागणार आहे. जळगावमध्ये विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी करण पवार यांच्यासह ठाकरे गटाची वाट धरल्यामुळे स्मिता वाघ यांच्याविरोधात बंडखोरीमुळे त्यांच्याच पक्षातील तगडे आव्हान उभे आहे.(Jalgaon)

Jalgaon Lok Sabha | जळगावात मोठा ट्विस्ट; भाजप खासदाराच्या पत्नी ठाकरे गटाच्या उमेदवार..?

वाघ यांच्या विजयाबाबत शंका..?

यामुळेच भाजपश्रेष्ठींना स्मिता वाघ यांच्या विजयाबाबत शंका निर्माण झाल्यामुळे जळगावात नव्या उमेदवाराबाबत चाचपणी सुरू आहे. पारोळाचे नगराध्यक्ष करण पवार यांची पारोळा-एरंडोल मतदारसंघात मोठी ताकद असून, या विधानसभा मतदार संघातील २०१९ च्या निवडणुकीत तिकीट कापलेले भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील यांना जळगाव लोकसभेचे तिकीट देण्याबाबत भाजपकडून विचार विनिमय सुरू असल्याची माहीती समोर आली आहे. याबाबत जळगावात भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी चर्चा केली.(Jalgaon)

मात्र, यानंतर मध्यमांसमोर त्यांनी उमेदवार बदलणार नसल्याचे सांगितले. मात्र, तरीही गेल्या काही दिवसांपूर्वी माजी खासदार ए. टी. पाटील यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत भेटीगाठी घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ए. टी. पाटील किंवा त्यांचा मुलगा अॅड. रोहित पाटील यांच्याही नावाची चर्चा असल्याचे समोर आले आहे. (Jalgaon)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!