Horoscope 12 April | प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस खास; वाचा आजचे राशीभविष्य

0
52
Horoscope 9 May 2024
Horoscope 9 May 2024

Horoscope 12 April |  ज्योतिष शास्त्रानुसार, आज 12 एप्रिल 2024, शुक्रवारचा दिवस हा सर्वच राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. आजचा हा चैत्र महिन्याचा चौथा दिवस हा अनेकांसाठी उत्तम असेल. मात्र, आज ग्रहांच्या हालचाली या काही राशीच्या लोकांच्या जीवनात अडथळे निर्माण करू शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस  कसा असेल..? हे जाणून घेऊयात.. वाचा आजचे 12 राशींचे राशीभविष्य..

मेष राशी 

आज मेष राशीच्या लोकांना कामाच्या निमित्ताने लांबच्या प्रवासाचे योग येतील. आज तुमच्या घरात एखादे शुभ कार्य ठरू शकते. आरोग्याविषयी बोलायचे झेल तर, संधिवाताने त्रस्त असणाऱ्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तरुणांना आज काही समस्या उद्भवू शकतात. याचे निराकरण करण्यासाठी आधी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करा. त्यावर विचार करून मगच  कुठलीही पावले उचला.(Horoscope 12 April)

वृषभ राशी 

नोकरदार वर्गाच्या लोकांचे किंवा व्यावसायिकांचे एखादे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम आज मार्गी लागेल. आज काही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही येऊ शकतो. मात्र, अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच कुठलीही पाऊले उचलावीत. तरुणांना मानसिक तणाव जाणवेल. त्यामुळे त्यांनी आज काही वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवावा.

Horoscope 12 April | मिथुन राशी 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्तम असेल. आज तुम्ही तुमच्या घरात काही सुधारणा करू शकतात. नर्सरी, किंवा शेती औषधांशी संबंधित व्यवसाय असणाऱ्यांनासाठी आजचा दिवस पर्वणी ठरेल. आज तुमच्या व्यवसायात काही बदल होऊ शकतात. आज तुमचे विरोधक तुमच्याविरोधात काही कात रचू शकतात. पण त्यांचा डाव उलटवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. (Horoscope 12 April)

Horoscope 10 April | ‘या’ लोकांना मिळेल ग्रहांचे सहकार्य; वाचा आजचे राशीभविष्य

कर्क राशी 

नोकरदार वर्गाच्या लोकांवर आज अधिक जबाबदारी वाढू शकते. त्यामुळे तणाव आणि चिडचिडही वाढेल. मात्र, तरीही आपल्या रागावर आणि शब्दांवर नियंत्रण ठेवावे. प्रेमी जोडपे कुटुंबीयांना सांगण्याचा विचार करत असतील. तर, आजचा मुहूर्त शुभ आहे. तुम्ह तुमच्या कुटुंबीयांसमोर प्रस्ताव मांडण्यास हरकत नाही. आज तुम्ही तुमच्या माणमिळवू स्वभावाने समोरच्यांची मने जिंकाल. कुटुंबातील वाद टाळण्यासाठी आज महिलांना समजूतीचे धोरण स्वीकारावे लागेल.

सिंह राशी 

आजचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी उत्तम असेल. आज तुम्हाला काही नोकरीच्या किंवा रोजगाराच्या संधीही चालून येऊ शकतात. आज तुमची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. महिला वर्गासाठी आजचा दिवस हा आनंदाचा असेल. आज तुम्हाला इच्छित असलेले काम होऊ शकते. आज तुमच्या कुटुंबात काही धार्मिक कार्यही होण्याची शक्यता आहे. (Horoscope 12 April)

कन्या राशी 

आजचा दिवस हा कन्या राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा आणि प्रतिष्ठा वाढवणारा दिवस असेल. आज तुमचा माणमिळावू स्वभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुमचाच नाहीतर तुमच्या आजूबाजूच्या लोकांचाही फायदा होईल. तुमचा सर्वांना सोबत घेऊन चालणारा सर्वसमावेशक स्वभाव यामुळे तुमची आज कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांनी तुमच्यामध्ये जेवढी पात्रता आहे. ती सर्व पणाला लावून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. येणाऱ्या काळात तुम्हाला यचे चांगले फळ मिळेल.  (Horoscope 12 April)

Horoscope 5 April | आजचा दिवस ‘या’ राशींसाठी तोट्याचा; वाचा आजचे राशीभविष्य

तूळ राशी 

नोकरदार वर्गाच्या लोकांना तुम्ही आजपर्यंत तुमच्या कंपनीसाठी घेतलेले कष्टाचे फळ मिळेल. नोकरदार वर्गाच्या लोकांना आज तुमच्या महत्वाकांशी स्वभावाला साजेशी अशी मोठी जबाबदारी मिळेल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, कामाच्या तणावामुळे आज तुम्हाला डोकेदुखी, अंगदुखी यासारख्या समस्या जाणवू शकतात.

वृश्चिक राशी  

आह वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. त्यामुळे तुमची आर्थिक घडी चांगली बसेल. राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना समाजात तुमच्या नेतृत्वाला लोक उत्तम दाद देतील. लोकांवर प्रभाव पडण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. महिलांना आज स्वतःच्या आवडी जोपासण्याची संधी मिळेल. (Horoscope 12 April)

धनु राशी 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसोटीचा असेल. आज तुमच्या वैवाहिक आयुष्यात काही वाद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही तडजोड करावी लागेल. तसेच आज तुम्ही तुमच्या रागावरही नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आज कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका आणि सामंजस्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा.

मकर राशी 

नोकरदार वर्गाला आणि व्यावसायिकांना आज आपापल्या कामात आर्थिक नुकसान होऊ शकते. नोकरीत किंवा व्यावसायामध्ये चुकीचे धोरण ठेवल्याने आज तुम्हाला तोटा सहन करावा लागेल. मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना आणि नकारात्मक गोष्टींना आवर घाला आणि आज जास्तीत जास्त वेळ तुमच्या कुटुंबासोबत आणि मुळणसोबात घालवण्याचा प्रयत्न करा. संयम ठेवा सर्व समस्यांचे निराकरण होईल.

कुंभ राशी 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फार चांगला नसेल. आज वाहने चालवताना जरा जपून चालवावीत. नोकरदार वर्गाच्या लोकांनी विशेषतः यंत्राशी निगडित काम असणाऱ्यांनी आज काम करताना लक्ष देऊन काम करावे. आज तुमचे तुमच्या कुटुंबात भावंडांसोबत वाद होऊ शकतात. तर, महिलांनी घरातील काम करताना आरोग्याच्या दृष्टीने स्वतःला सांभाळावे आणि सावधगिरी बाळगूनच काम करावे. दुखापत होण्याची शक्यता आहे. (Horoscope 12 April)

मीन राशी 

आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी काहीसा गोंधळलेला असेल. तुम्ही ठरवलेली एखाद्या गोष्टींसाठी कुटुंबाचा विरोध असेल. त्यामुळे एकूणच परिस्थितीमुळे तुम्ही आज गोंधळलेले असाल. त्यामुळे कधी अतिउत्साह तर कधी आळसात तुमचा दिवस जाणार आहे. मात्र, तुम्ही दृढनिश्चयी आहात. त्यामुळे तुम्ही ठरवलं तर, तुम्ही प्रत्येक गोष्टीतून बाहेर पडू शकतात. (Horoscope 12 April)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here