Skip to content

Dhule Lok Sabha | धुळ्यात उमेदवार जाहीर होताच, जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

Dhule Lok Sabha

Dhule Lok Sabha | राज्यात लोकसभा निवडणुकींची धूम सुरू असून, काल काँग्रेसने आपल्या राहिलेल्या जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात काँग्रेस कोणाला मैदानात उतरवणार याची उत्सुकता होती. अखेर काल काँग्रेसने धुळ्यात महाविकास आघाडीकडून माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले असून, पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनेक वर्षांपासून आपण पक्षासोबत एकनिष्ठ राहूनही आपल्यावर हा अन्याय झाला आहे.Dhule Lok Sabha

यामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया श्याम सनेर यांनी दिली असून, या वेळी बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. पक्षाने बाहेरील उमेदवाराला संधी दिली असून, हा आपल्यावर झालेला अन्याय आहे. यामुळे पदाचा राजीनामा दिला असून येत्या दोन दिवसात उमेदवार बदलण्याबाबत पक्षाने कुठलाही निर्णय न घेतल्यास आपण कठोर भूमिका घेणार असल्याचेही यावेळी श्याम सनेर यांनी सांगितले. दरम्यान, शाम सनेर यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असून, आता याबाबत पक्ष खरंच उमेदवार बदलण्याचा निर्णय घेणार का..? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. Dhule Lok Sabha

Dhule Lok Sabha | जातींमध्ये भांडणं लावली, कमिशन घेतले; ड्रायव्हरही करू शकतो भामरेंचा पराभव..?

Dhule Lok Sabha | गरीब असल्याने आमचा नेतृत्वाने बळी घेतला 

अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. पण मी काँग्रेसच्या विचारसरणीशी कधीही तडजोड न करणारा कार्यकर्ता आहे. पक्षाकडे मी धुळे लोकसभेची उमेदवारी माागितली होती. गेल्या ३० वर्षात मी कधीच इतका व्यथित झालो नाही. इतकं मला लोकसभेच्या उमेदवारीच्या महिनाभराच्या काळात पक्ष श्रेष्ठींनी व्यथित केलं. सतत काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाहीये, सक्षम चेहरा नाहीये, आम्ही सामान्य आणि गरीब असल्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा पक्ष नेतृत्वाने नेहमी बळी घेण्याचे काम केले आहे. बाहेरुन उमेदवार आणून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांवर मीठ चोळण्याचे काम पक्षाने केले आहे. Dhule Lok Sabha

Dhule Loksabha | धुळे लोकसभेतील इच्छुकांच्या गर्दीत अविष्कार भुसे ठरताय लोकप्रिय…

उमेदवार बदला, अन्यथा….

धुळे ओकसभेचा उमेदवार तात्काळ बदला. अन्यथा धडा शिकवण्यासही आम्ही मागे-पुढे बघणार नाही. मतदारसंघात पक्षातीलच सक्षम उमेदवार द्या. बाहेरून उमेदवार आणू नका, असेही  श्याम सनेर यांनी यावेळी सांगिले. धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दोन टर्मचे खासदार भाजपचे डॉ. सुभाष भामरे, महाविकास आघाडीच्या उमेदवार माजी आरोग्य राज्यमंत्री काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव आणि वंचितच्या अब्दुल रेहमान यांच्यात लढत रंगणार आहे. Dhule Lok Sabha


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!