Skip to content

Malegaon | मालेगावात सामूहिक नमाज पठणाच्यावेळी फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज

Malegaon

Malegaon |  काल मालेगाव येथील इदगाह मैदानात रमजान ईदच्या निमित्ताने सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी याठिकाणी स्थानिक आमदार मौलाना मुफ्ती महंमद हे देखील उपस्थित होते. दरम्यान, ते उपस्थित बांधवांना संबोधित करीत असताना अचानक यामधील एक तरुण उठला आणि त्याने पॅलेस्टाइनचा ध्वज फडकावला आणि उपस्थितांमधून चालत तो थेट मंचासमोर पॅलेस्टाइनचा ध्वज घेऊन आला. मात्र, विशेष म्हणजे हे सर्व होत असताना त्याला कोणीही अडवले नाही. मालेगाव येथे रमजान ईदचा हा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने मालेगाव येथील इदगाह मैदानात सामुदायिक नमाज पठण करण्यात आले होते.

Malegaon | मंत्री भुसेंच्या पाठपुराव्याला यश; मालेगावचे सामान्य रुग्णालय ३०० खाटांमध्ये श्रेणीवर्धित होणार

या कार्यक्रमाला मालेगाव शहराचे आमदार असलेले मौलाना मुफ्ती महंमद यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते आपल्या भाषणात पॅलेस्टाइनवर होत असलेल्या अन्यायाबाबत बोलत होते. दरम्यान, मौलाना बोलत असतानाच समोर बसलेल्या गर्दीतून एक तरूण उठला आणि त्याने पॅलेस्टाइनचा झेंडा फडकावला व तो झेंडा घेऊन थेट मंचासमोर येऊन उभा राहीला. असे करताना त्याला कोणी अडवले नाही. शिवाय या प्रकाराचे उपस्थितांकडून चित्रीकरण केले जात होते. दरम्यान, त्या तरुणाने यावेळी कोणत्याही घोषणाही दिल्या नाही. याबाबत आमदार मौलाना मुफ्ती यांना जाब विचारला असता, “त्या तरुणाचा आणि आमचा काहीही संबंध नसल्याचे ते म्हणाले.

Malegaon News | मालेगावात तेरा वर्षीय मुलाने चिमुकल्याला फेकलं सांडपाण्यात; अन् नाका-तोंडात पाणी गेल्याने…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!