Skip to content

Malegaon News | मालेगावात तेरा वर्षीय मुलाने चिमुकल्याला फेकलं सांडपाण्यात; अन् नाका-तोंडात पाणी गेल्याने…

Malegaon News

Malegaon News | गेल्या काही दिवसांपूर्वीच मालेगावमधील एका बालकाचा मृतदेह हा चांदवडच्या घाटात सापडल्याची घटना ताजी असून, त्याच घटनेचा तपास सुरू आहे की, आता आणखी एका बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मालेगावमधून उघडकीस आली आहे. या घटनेत साडेतीन वर्षाच्या एका चिमूरड्याला एका तेरा वर्षाच्या विधीसंघर्षित मुलाने साठलेल्या सांडपाण्यात फेकून दिले. दरम्यान, नाका तोंडात सांडपाणी गेल्याने या बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मालेगावच्या दातारनगर परिसरात घडली आहे. तर, ही या मुलाला पाण्यात फेकून दिल्याची संपूर्ण घटना येथील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.(Malegaon News)

हस्सान मलिक मुदस्सीर हुसेन असे या मृत बालकाचे नाव आहे. तर, हलवाई मशीद परिसरातील यंत्रमाग कारखान्याजवळ मृत हस्सान हा त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. त्यावेळी तिथे हा टोपी घातलेला आरोपी १३ वर्षीय विधी संघर्षित मुलगा आला आणि त्याने हस्सानला उचलले आणि तेथे असलेल्या सांडपाण्यात फेकून दिले. दरम्यान, या घटनेने संपूर्ण मालेगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.(Malegaon News)

Malegaon Leopard | मालेगावच्या लॉन्समध्ये बिबट्या; चिमुकल्याच्या हुशारीने मोठा अनर्थ टळला  

Malegaon News | नेमकं प्रकरण काय..?

या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरातील दातारनगर परिसरात वास्तव्यास असणारे चार लहान मुले हे या विधिसंघर्षित तेरा वर्षीय मुलासोबत खेळत होती. दरम्यान, खेळत असताना ही सर्व मुले तिथे साचलेल्या सांडपाण्याच्या डबक्याजवळ गेली. काही वेळ येथे ही मुलं खेळत होती. यानंतर या आरोपी तेरा वर्षीय टोपी घातलेल्या मुलाने हस्सान मलिक मुदस्सीर हुसेन (रा. दातारनगर, रमजानपुरा) याला उचलले आणि सांडपाण्याच्या डबक्यात फेकले आणि तो तेथून मुलगा पळून गेला. (Malegaon News)

कारखान्यातील सीसीटीव्हीत ही घटना कैद 

दरम्यान, या चिमूरड्याला वाचवण्यासाठी त्यापैकी एका लहान मुलाने पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा पाय फसल्याने त्याला हस्सानला वाचवता आले नाही. तर, तोपर्यंत बुडून या चिमुलक्याचा मृत्यू झाला होता. तर, ही घटना उघडकीस येताच या मृत बालकाच्या कुटुंबियांनी माजी नगरसेवक शेख खालीद हाजी यांच्या सूचनेवरुन या घटनास्थळी सांडपाण्याच्या डबक्याजवळ, कारखान्यात किंवा अन्यत्र सीसीटीव्ही आहे का? याचा तपास केला असता, त्यावेळी कारखान्यातील सीसीटीव्हीत ही घटना निदर्शनास आली. (Malegaon News)

Malegaon | मनपाची आर्थिक हितविरोधी कचरा संकलन निविदा प्रक्रिया रद्द करावी

विधीसंघर्षित मुलाचा तपास सुरू 

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने तेथील घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि पंचनामा केला. यानंतर मृतदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तर, या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक पवार हे करत आहेत.(Malegaon News)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!