Malegaon Leopard | मालेगावच्या लॉन्समध्ये बिबट्या; चिमुकल्याच्या हुशारीने मोठा अनर्थ टळला  

0
27
Malegaon Leopard
Malegaon Leopard

Malegaon Leopard | नाशिकमध्ये बिबट्यांचे दर्शन होण्याच्या घटना ह्या सर्रास होत असतात. दरम्यान, आता नशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात आज सकाळच्या सुमारास भरवस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, यावेळी एका चिमुकल्याने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या मुलाने बिबट्याला एका खोलीत बंद केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये बिबट्यांच्या मुक्त संचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील जय भवानी रोड परिसरात बिबट्याचा वावर आढळून आयला होता. तर, याआधी सिडको परिसरात एकाचवेळी दोन बिबट्यांना जेरबंद केले होते. यातच आता मालेगाव शहरात भरवस्तीत एका लॉन्समध्येच बिबट्या आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. (Malegaon Leopard)

Malegaon | मनपाची आर्थिक हितविरोधी कचरा संकलन निविदा प्रक्रिया रद्द करावी

Malegaon Leopard | नेमकं प्रकरण काय..?

दरम्यान, मालेगाव शहरातील नामपूर रोड परीसरातील एका लॉन्समध्ये बिबट्या शिरला असता, यावेळी येथे उपस्थित मोहित विजय आहिरे या लहान मुलाने प्रसंगावधान दाखवत हुशारीने या बिबट्याला लॉन्समधीलच एका खोलीत बंद केले. मालेगाव शहरातील भायगाव, जाजुवाडी येथील साई सेलिब्रेशन लॉन्समध्ये हा प्रकार घडला. यानंतर या बिबट्याला रेस्क्यु करण्यासाठी वनविभाग, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. (Malegaon Leopard)

मी लॉन्सच्या ऑफिसमध्ये होतो अन्… 

याबाबत मोहित विजय आहिरे या चिमुकल्याने सांगितले की, “मी लॉन्सच्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो. यावेळी मला बिबट्या येथे आल्याचे समजले. यानंतर तो बिबट्या लॉन्सच्या एका खोलीत शिरला असता. मी त्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि वडिलांना कळवले. दरम्यान, मोहितच्या या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून या चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.(Malegaon Leopard)

Kisan Sabha Protest | अखेर संप मिटला; मंत्री दादा भूसेंच्या शिष्टाईला यश

नागरीकांनी सुटकेचा निःश्वास सोडला

हा बिबट्या मालेगाव शहरातील साई सेलिब्रेशन लॉन्समध्ये शिरल्याची माहिती पासरताच या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी येथे एकच गर्दी केली. यानंतर नाशिक येथील रेसक्यू टीम आणि येथील स्थानिक अधिकारी, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ब्लो पाईपद्वारे डॉट देत या खोलीत बंद असलेल्या बिबट्याला भुल दिली. यानंतर बिबट्या बेशुद्ध होताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केले. दरम्यान, जेरबंद केलेला हा बिबट्या नर जातीचा असल्याची प्राथमिक माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर, या मुक्त संचार करत असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने नागरीकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. (Malegaon Leopard)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here