Deola | देवळा येथे मटका अड्ड्यावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

0
36
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या पथकाने येथे सोमवार (दि. ४) रोजी मटका अड्ड्यावर छापा टाकून एकूण १० लाख ६० हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, संबंधित आरोपीच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाच्या या मोठ्या कारवाईने देवळ्यातील अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक यांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने दिलेली माहिती अशी की, देवळा सटाणा रस्त्यावरील माळवाडी शिवारात अवैद्यरित्या सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता, याठिकाणी जवळपास अठरा लोक मटका खेळतांना आढळून आले.(Deola)

Malegaon Leopard | मालेगावच्या लॉन्समध्ये बिबट्या; चिमुकल्याच्या हुशारीने मोठा अनर्थ टळला  

नेमकं प्रकरण काय..?

या प्रकरणातील आरोपी मटका चालक नागेश लक्ष्मण जंगम (वय ४२) (रा. धोडंबे ह.मु वडनेर भैरव ता. चांदवड) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी टाईम, कल्याण, डे श्रीदेवी नावाचा अंक आकडे लावुन मटका जुगार खेळतांना व इतर अठरा लोक आकडे लावतांना मिळुन आले. यावेळी सदर आरोपीची झाडाझडती घेऊन रोख रक्कम व मोबाईल फोन असे १,४०,४५०/- रुपये तसेच सदर घटनास्थळावर लावण्यात आलेल्या २२ मोटार सायकल एकुण किंमत ९,२०,००० रुपये व मटका खेळण्यासाठी लागणारे टाईम, कल्याण, डे श्रीदेवी असे नाव असलेले अंकआकडे लिहीलेली ८ पुस्तके, कार्बनचे तुकडे, १ पॅड ४ निळे रंगाचा असा एकुण १०,६०,४५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडुन गुन्ह्यात जप्त करुन यातील आरोपी क्र. १ ते १९ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Deola)

Kisan Sabha Protest | अखेर संप मिटला; मंत्री दादा भूसेंच्या शिष्टाईला यश

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील ग्रामिण भागात सर्वच अवैद्य बंद होते. त्यांची नुकतीच बदली झाल्यानंतर पुन्हा हे अवैद्य धंदे सुरू झाल्याची चर्चा आहे. यामुळे ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला मटका व अवैद्य गावठी दारू तसेच रस्त्यांवरील ठाब्यावर सुरू असलेला देशी विदेशी दारू विक्री व्यवसाय पुन्हा सर्रासपणे सुरू झाल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. ह्या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली असून, अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अधिक तपास पोउनि काळे करीत आहेत.(Deola)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here