Lok Sabha Elections Date | आगामी लोकसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा…

0
5
Nashik Lok Sabha
Nashik Lok Sabha

Lok Sabha Elections Date |  देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांची धूम सुरू असून, सर्वच पक्षांची निवडणुकींसाठी जोरदार तयारी सुरू आहे. अनेक दिवसांपासून केवळ शक्यता वर्तविण्यात येत होत्या. मात्र आता अखेर या बहूप्रतीक्षित लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर होण्याचा मुहूर्त ठरला आहे. दरम्यान, यानुसार आज याबाबतची मोठी माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून येत्या १४ मार्च रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच यावर्षीही तब्बल सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. तर, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू होऊ शकते. (Lok Sabha Elections Date)

Lok Sabha Elections Date | पुढील आठवड्यात होणार जाहीर 

येत्या १६ जून रोजी १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ हा पूर्ण होत असून, याआधी निवडणूका होणे गरजेचे आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकीची तारीख अधिकृतरित्या जाहीर केली जाऊ शकते.(Lok Sabha Elections Date)

Lok Sabha 2024 | विद्यमान खासदार आणि इच्छुक उमेदवारात केंद्रीय मंत्र्यांसमोर ‘तु तु मै मै’

तसेच त्या दिवसापासूनच आचरसंहिता देखील लागू होणार आहे. सध्या निवडणूक आयोग हे देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात असून, आयोगाकडून सर्व राज्यातील एकूण राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी हे सर्व राज्यांचे दौरे करुन याबाबत आढावा घेत आहेत. दरम्यान, या सर्व राज्यांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.

कोणत्या टप्प्यात कोणत्या राज्यात होणार मतदान..?

१. पहिला टप्प्यात – जम्मू आणि कश्मीर, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिजोरम, नगालँड, ओडिशा, सिक्किम, तेलंगाणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान, लक्षद्वीप या राज्यांत मतदान होऊ शकते.(Lok Sabha Elections Date)

Lok Sabha 2024 | काय सांगता..! आता खासदार अमोल कोल्हेही…

२. दूसरा टप्प्यात – आंध्र प्रदेश, आसाम,  बिहार, छत्तीसगढ, जम्मू आणि कश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, तमिलनाडु, त्रिपुरा, यूपी, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी या राज्यांत मतदान होऊ शकते.

३. तिसऱ्या टप्प्यात – आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू आणि कश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव या राज्यांत मतदान होऊ शकते.

४. चौथ्या टप्प्यात – बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांत मतदान होऊ शकते.(Lok Sabha Elections Date)

५. पाचव्या टप्पा- राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू और कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश या राज्यांत मतदान होऊ शकते.

६. सहाव्या टप्प्यात – बिहार, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली-एनसीआर या राज्यांत मतदान होऊ शकते.

७. सातव्या टप्प्यात – उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, चंडीगढ, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांत मतदान होऊ शकते.(Lok Sabha Elections Date)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here