Skip to content

Sudha Murty | इन्फोसिसच्या मालकिण सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड

Sudha Murty

Sudha Murty | देशात लोकसभेची धूम सुरू असून, नुकतीच पंतप्रधानांनी ट्वीट करून एक मोठी माहिती दिली आहे. यानुसार इन्फोसिसच्या सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी तथा लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन दिली आहे. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू आहेत. (Sudha Murty)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्याचा मला अत्यंत आनंद आहे. सामाजिक कार्य, परोपकार व शिक्षण यासह त्यांचे विविध क्षेत्रातील योगदान हे प्रेरणादायी आहे. त्यांची राज्यसभेतील उपस्थिती ही एक महत्त्वाची गोष्ट असून, आपल्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे, जो आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांच्या सामर्थ्याचे व क्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण देतो. त्यांना त्यांच्या यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी खूप शुभेच्छा.(Sudha Murty)

Dhule Loksabha | धुळे लोकसभेतील इच्छुकांच्या गर्दीत अविष्कार भुसे ठरताय लोकप्रिय…

समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. सुधा मूर्ती या महिला आणि बालकांसाठी समाज कार्य करत असून, त्यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तके देखील लिहिली आहेत. सुधा मूर्ती यांनी १९८१ मध्ये इन्फोसिसच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे पती एनआर नारायण मूर्ती यांना १०,००० रुपयांचे कर्ज दिले होते. सुधा मूर्ती यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यावेळी त्या एका भाड्याच्या घरात राहत होते आणि आर्थिक परीस्थितीदेखील हलाखीची होती.  (Sudha Murty)

Loksabha 2024 | अशी आहे महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची यादी..?

Sudha Murty | कोण आहेत सुधा मूर्ती..?

सुधा मूर्ती यांचे पती नारायण मूर्ती हे इन्फोसिस कंपनीचे मालक आहेत. तर, त्यांना दोन मुलं आहेत. त्यांची मुलगी अक्षता मूर्ती ही ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत. त्या फॅशन डिझायनर देखील आहे. तर, मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म सोरोकोचे मालक आहेत. जे डेटाचे अर्थपूर्ण माहितीमध्ये रूपांतर करण्यात मदत करते. रोहन मूर्ती यांनी भारतातही ‘मूर्ती शास्त्रीय ग्रंथालया’ची स्थापना केली असून, अमेरिकन संस्कृत विद्वान शेल्डन पोलॉक यांच्या नेतृत्वाखालील क्ले संस्कृत लायब्ररी प्रकल्पाचा एक भाग आहे. त्यांची पत्नी अपर्णा कृष्णन या निवृत्त नौदल अधिकारी केआर कृष्णन आणि माजी बँकर सावित्री कृष्णन यांची मुलगी आहे.(Sudha Murty)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!