Nashik Loksabha | महायुतीकडून राहुल आहेर आणि करंजकरांच्या नावाची चाचपणी..?

0
38
Nashik Loksabha
Nashik Loksabha

Nashik Loksabha |  गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत नाशिक लोकसभेचा वाद सुरू आहे. महायुतीचे तिन्ही प्रमुख पक्ष नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे उमेदवारीसाठी कमालीचे आग्रही होते. यासाठी भुजबळांनी बँकांचे कर्ज फेडायला तर, गोडसेंनी प्रचारालाही सुरुवात केली होती. एवढंच काय तर, छगन भुजबळ नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्याही चर्चा होत्या. मात्र, दुसऱ्या दिवशीच भाजपने या दोन्ही उमेदवारांना ‘खो’ देत. नवीन उमेदवारांची चाचपणी सुरू केली.

यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाजपचे आमदार राहुल ढिकले आणि अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांची नावं समोर आली होती. दरम्यान, आता या यादीत आणखी दोन नावांचा समावेश झाला आहे आणि ते म्हणजे चांदवड-देवळा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा माजी केंद्रीय मंत्री दौलतराव आहेर यांचे सुपुत्र डॉ. राहुल आहेर आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर.

Loksabha Election | ना गोडसे, ना भुजबळ; नव्या सर्वेक्षणात नव्या नावांची चर्चा

विजय करंजकर शिंदे गटात जाणार..?

गेल्या दोन टर्मपासून ठाकरे गटाकडून तिकीटाच्या आशेवर असलेले जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना यंदाही डावलण्यात आले असून, त्यांच्याऐवजी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे विजय करंजकर हे प्रचंड नाराज असून, राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर करंजकर यांनी “आपण निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार, आणि पाडणार पण” असे म्हटले होते. त्यामुळे ते एखादा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, विजय करंजकर शिंदे गटात प्रवेश करू शकतात. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास नाशिक लोकसभेची उमेदवारी त्यांनी दिली जाऊ शकते.

Nashik Loksabha | राहुल आहेरच का..?

तर, दुसरीकडे आमदार राहुल आहेर हे गेल्या दोन टर्मपासून भारतीय जनता पक्षाचे चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार शिरीष कोतवाल यांच्या ११ हजार मतांनी तर, अपक्ष उमेदवार आत्माराम कुंभार्डे यांचा २५ हजार मतांनी पराभव केला होता. तसेच त्यांच्या मागे वडिलांचा राजकीय वारसा आणि ताकद देखील आहे. डॉ. दौलतराव आहेर हे गेल्या तीन दशकातील आक्रमक आणि झपाटलेला नेता व राजकीय झंझावात म्हणून ओळखले जात होते.

Nashik Loksabha | नाशिकच्या जागेसाठी भाजप कार्यकर्त्यांचे कार्यालयात ठिय्या आंदोलन

१९८५ यावर्षी ते नाशिक विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर १९८९ साली ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. त्यावेळी शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात त्यांना राज्याचे आरोग्यमंत्रीपद देण्यात आले होते. देवळा तालुक्याची निर्मिती आणि वसंतदादा साखर कारखाना सुरू होण्यासाठी त्यांची आग्रही भूमिका होती. नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ निर्मिती, नाशिकमध्ये सर्व सोयीसुविधांयुक्त संदर्भ सेवा रुग्णालय यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. तापी खोरे महामंडळाचे अध्यक्ष, मविप्र संस्थेचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी त्यांच्या राजकीत कारकिर्दीत भूषविली होती.

एकूण परिस्थिती पाहता महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजेंच्या विरोधात हे दोन्ही उमेदवार एक तगडे आव्हान ठरू शकतात. त्यामुळे महायुतीकडून आता ह्या नव्या नावांची चाचपणी सुरू आहे. दरम्यान, यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार आणि नाशिक लोकसभेत कोणत लढत रंगणार हे आता येणारा काळच सांगेल.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here