Deola | देवळा येथील मेतकर पतसंस्थेला २५ लाख १० हजार रुपयांचा नफा

0
6
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील मधुकर पांडुरंग मेतकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला चालू आथिक वर्षात २५ लाख १० हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सुरेश दगा नेरकर यांनी दिली. मार्च अखेर संस्थेकडे ५ कोटी ७८ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून, कर्ज वाटप ४ कोटी ८९ लाख रुपयांचे झालेले आहे. संस्थेने वित्तीय संस्थांमध्ये ३ कोटी १५ लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणुक केलेली असून, संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी २३ लाख रुपये आहे. संस्थेकडे विविध प्रकारचा १ कोटी ३४ लाखांचा निधी जमा झालेला असून , वर्षअखेर संस्थेचे खेळते भागभांडवल ८कोटी ६९ लाख रुपये आहे.

Deola | थकीत मानधन द्या, अन्यथा उपोषण; देवळा पोलीस पाटील संघटनेचा इशारा

कर्ज वसुलीचे प्रमाण ९४.५१ टक्के असून ,थकबाकीचे प्रमाण ५.४९टक्के आहे. संस्थेचा सी.डी. रेशो ५९.३३टक्के तर सी. आर आर ११.टक्के व , एस. एल. आर ५४.०१ टक्के आहे. संस्थेने स्थापनेपासूनच दरवषी लाभांश व वेळोवेळी उच्च प्रतीचे सभासद भेटवस्तूचे वाटप केलेले आहे. संस्थेच्या वतीने गरजु सभासदांना वेळोवेळी तात्काळ कर्जपुरवठा केलेला असल्याने चेअरमन सुरेश नेरकर यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थापक दिलीप मेतकर, व्हा. चेअरमन केतन लुंकड, संचालक माधुरी मेतकर, अजय मेतकर, विष्णु जाधव, संतोष शिंदे, जाकीर शेख, तेजस मेतकर, नितीन आहेर, नानाजी चंदन, गिरीष कचवे, शुभांगी मेतकर सचिव संदिप देवरे, भूषण शिरसाठ ज्ञानेश्वर मेतकर, संदिप भामरे आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here