Eknath Khadse | खडसेंच्या लेकीचा मोठा निर्णय; वडिलांचा फोटोच हटवला..?

0
4
Eknath Khadse
Eknath Khadse

Eknath Khadse |  गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर स्वतः एकनाथ खडसेंनीच आपण पुढील १५ दिवसांत भाजप प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शरद पवार गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाहीतर, पक्षांतर करू पाहणाऱ्या आपल्या वडिलांचा फोटोही त्यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाईलमधून हटवला आहे. एकनाथ खडसे हे आता भाजप प्रवेश करणार आहे. त्यांच्या या निर्णयाला रोहिणी खडसेंचा विरोध असल्याचे यामुळे दिसून आले. (Eknath Khadse)

Devendra Fadanvis | नाथाभाऊंच्या घरवापसीवर फडणवीस, महाजन नाराज..?

रोहिणी खडसेंना विधानसभेचे तिकीट दिले जाणार..?

वडिलांनी जरी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला असला, तरीही लेकीने मात्र शरद पवारांचीच तुतारी फुंकणार असल्याचे जाहीर केले. आपला हा निर्णय रोहिणी खडसे यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना कळविल्यानंतर जाहीर केला. दरम्यान, त्यांनी आता एकनाथ खडसे यांच्याविरोधात मोठा निर्णय घेतला  असून, स्वतःच्या फेसबुक प्रोफाईलमधून त्यांनी आपल्या वाडिलांचा म्हणजेच एकनाथ खडसेंचा फोटो हटवला आहे. अधिक माहितीनुसार, रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभेची उमेदवारी दिली जणीची शक्यता आहे. (Eknath Khadse)

खडसे-शहांची भेट ! भाजपात परतण्याची चर्चा; अखेर त्यांनी दिले स्पष्टीकरण

Eknath Khadse | राज्याचा झंजावती दौरा करणार

“कोणत्याही परिस्थितीत मी भाजपसोबत जाणार नाही. भविष्यातही आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात महिला प्रदेशाध्यक्ष या पदावर कार्यरत असून आपल्या पक्षाने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचं रोहिणी खडसेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं आहे. (Eknath Khadse)

तसेच यावेळी त्यांनी लवकरच राज्यात महिला मेळाव्यांचे आयोजन करत आपण राज्याचा झंजावती दौरा करणार असल्याचंही सांगितलं. या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी महिलांची सक्षम ताकद ही उमेदवारांच्या पाठीशी उभी करणार असल्याचेही यावेळी त्यांनी जाहीर केले. एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून, यानंतर आता रोहिणी खडसे कोणती भूमिका घेणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, आता त्यावर स्वतः रोहिणी खडसे यांनीच मौन सोडले असून, आपण शरद पवारांसोबत आणि त्यांच्या राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचा आपला निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. (Eknath Khadse)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here