Skip to content

Uddhav Thackeray | ही केमिकल लोचाची केस; यांना बाळासाहेब झाल्यासारखं वाटतंय..?

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray |  गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मनसे महायुतीत सामील होण्याच्या चर्चांना अखेर काल मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी ब्रेक लावला असून, मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, यानंतर महाविकास आघाडी, ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर जोरदार टिका केली आहे. ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून,

यात उद्धव ठाकरे म्हणताय की “‘त्या लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटातील मुन्नाभाईसारखी एक केस आपल्याकडे आहे. ज्याला स्वत: बाळासाहेब झाल्यासारखं वाटतंय. त्यामुळे हल्ली ते शाल घेऊन फिरतात”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. हा जुना व्हिडिओ पोस्ट करत ठाकरे गटाने राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. (Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray | दिल्लीतून उद्धव ठाकरेंचे भाजपला खुले आव्हान

Uddhav Thackeray | त्याच्या डोक्यात ‘केमिकल लोचा’ आहे..! 

”मला एका शिवसैनिकाने विचारलं की, तुम्ही तो लगे रहो मुन्नाभाई चित्रपट पाहिलाय का? त्याच्यात नाही का त्या मुन्नाभाईला गांधीजी दिसतात. गांधीजी बोलतात, मग तो पण गांधीगिरी करायला लागतो. तशीच एक केस आपल्याकडेही आहे. ज्याला आता स्वत: बाळासाहेब झाल्यासारखं वाटतंय. हल्ली ते शाल घेऊनही फिरतात, कधी  मराठीच्या नादी लागतात.(Uddhav Thackeray)

तर, कधी हिंदुत्वाच्या नादी लागतात. पण मी म्हणालो, त्या चित्रपटातला मुन्नाभाई किमान लोकांची मदत तरी करत होता रे..! पण त्या चित्रपटाच्या शेवटी त्या मुन्नाभाईला कळतं की, त्याच्या डोक्यात ‘केमिकल लोचा’ आहे. तर ही त्यातलीच केमिकल लोचाची केस आहे. आणि हा चित्रपट या सत्य घटनेवर आधारीत आहे.” असं या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे बोलत आहे.

Gudipadwa Melava | राज ठाकरेंची तलवार म्यान; महायुतीला बिनशर्त पाठिंबा

शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा

दरम्यान, राज ठाकरेंनी काल महायुतीला पाठिंबा जाहीर केला असून, यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टिका करे;आय सुरुवात केली आहे. यातच आता शिवसेना ठाकरे गटाने आपल्या सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंच्या भाषणातील राज ठाकरेंवर टिका करत असल्याचा एक व्हिडिओ पोस्ट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Uddhav Thackeray)

तुमच्या पक्षाचा ‘नमो निर्माण पक्ष’ का झाला..?

तर, दुसरीकडे संजय राऊत यांनीही राज ठाकरेंवर टिका केली असून, ते म्हणाले की,”महाराष्ट्राची गेल्या अनेक दिवसांपासून जी लूट सुरू आहे. जे घाणेरडे खोक्याचे राजकारण राज्यात सुरू आहे. त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण केलेला पक्ष हा आता महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देतोय.,? त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील की, तुमच्या पक्षाचा ‘नमो निर्माण पक्ष’ का आणि कसं झाला? हेदेखील त्यांनी सांगावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (Uddhav Thackeray)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!