Nana Patole Car Accident | नाना पटोलेंना चिरडून मारण्याचा प्रयत्न; काँग्रेस नेत्याचा दावा..?

0
2
Nana Patole Car Accident
Nana Patole Car Accident

Nana Patole Car Accident |  मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपल्या सुनिश्चित प्रचारसभा झाल्यानंतर सुकळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा शहरालगत असलेल्या भीलवाडा या गावाजवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. मागून येणाऱ्या एका ट्रकने पटोले यांच्या उभ्या असलेल्या गाडीला जोरदार धडक दिली. दरम्यान, या अपघातात नाना पटोले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने यात कोणतीही जीवित हाणी झालेली नाही. ट्रक चालकाचे नित्रंयण सुटल्याने हा संपूर्ण अपघात झाला असल्याची माहिती आहे. (Nana Patole Car Accident)

उभ्या गाडीला भरधाव ट्रकची धडक

भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत पडोळे यांच्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली ताकद पणाला लावली असून, ते गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी या मतदारसंघात प्रचाराचे रान उठवले आहे. याच निमित्ताने ते काल रात्री भंडारा येथे आले असता, येथील भीलवाडा गावाजवळ मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, यात पटोले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने यात नाना पटोलेंना किंवा इतर कुणालाही कुठलीही दुखापत झालेली नाही. या अपघाताची माहिती मिळाताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. (Nana Patole Car Accident)

Nana patole : सत्तेसाठी भुकेल्या भाजपने राज्यात तोडफोडीचे महाभारत चालवलं आहे.

Nana Patole Car Accident | 25 वर्षानंतर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार

काँग्रेसने भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघातून डॉ.प्रशांत पडोळे यांना तिकीट दिले आहे. दरम्यान, गेल्या पंचवीस वर्षांपासून या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार होता. मात्र, आता तब्बल २५ वर्षानंतर ही भंडारा-गोंदिया  मतदार संघाची जागा आपल्याकडे घेण्यात काँग्रेसला यश आले असून, २५ वर्षानंतर येथे काँग्रेस उमेदवार उभा आहे.

त्यामुळे येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, त्यामुळे या मतदार संघात काँग्रेसने ताकद पणाला लावली आहे. यासाठी मतदार संघातील प्रत्येक गावागावात सभा आणि बैठका घेतल्या जात आहे. एवढेच नाहीतर, आता तब्बल २५ वर्षानंतरही येथून काँग्रेसचाच उमेदवार भरघोस मतांनी निवडून येईल, असा विश्वासही उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केला आहे. (Nana Patole Car Accident)

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर ; भाजपा तर्फे दोन नावं चर्चेत

गाडीला जोरदार धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न..?

दरम्यान, यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे की, “विरोधी नेत्यांना संपवून भाजपला लोकसभा निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला जोरदार धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला असून, ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेतून घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नाही आणि ते अगदी सुखरूप आहेत.”(Nana Patole Car Accident)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here