Nashik Crime | उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; मद्य तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

0
77
#image_title

Nashik Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक पथकाने ओझर येथील दहावा मैल परिसरात सापळा रचून लाकडी भुश्यातुन मद्याचे बॉक्स लपवून दिव व दमण येथील विदेशी मद्याची तस्करी रोखण्यात यश आले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दहावा मैल परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी बोलेरो चालकास संशयाला आणि त्याने गाडी न थांबवता भरदाव वेगात पुढे नेली. पण पथकाने पाठलाग करून वाहनाबरोबर मद्याचा 18 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणांमध्ये परवेज बच्चे खान या संशयिताला अटक करण्यात आली आहे.

दिनांक 20 रोजी मुंबई आग्रा महामार्गावर अवैध मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती भरारी पथकाच्या दुय्यम निरीक्षक गणेश नागरगोजेंना लागताच, त्यांनी ओझर शिवरातील हॉटेल ‘द किकर’ समोर सापळा रचला. तेव्हा वाहन तपासणी करताना महिंद्रा बोलेरो पिकअप संशयास्पद रित्या मार्गस्थ होत असताना त्यांच्या लक्षात आले. तेव्हा पथकाचा संशय बळावला आणि त्यांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चालकाने गाडीचा स्पीड वाढवून पथकास चकवा देण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकातील अधिकाऱ्यांनी सेवकांनी बोलेरोचा काही अंतरापर्यंत पाठलाग करून अडविले.

Nashik Crime | धक्कादायक!; नाशकात अटकेची भीती घालत भामट्यांनी लाखो लुबाडले

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

वाहन ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्यात मागच्या बाजूला ट्रॉलीमध्ये लाकडी भूश्यानी भरलेल्या आढळल्या. यानंतर पोलिसांना दिव आणि दमण येथे विक्री करिता परवानगी असलेले परराज्यातील विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले. यादरम्यान अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीबाबत कोणासही माहिती असल्यास विभागाच्या टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ अथवा व्हाट्सअप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क करून माहिती कळवावी. नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे आवाहन विभागाने केले आहे.

Nashik Crime | सिन्नर तालुका हादरला; 3 शाळकरी मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न

पोलिसांकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी केलेल्या या कारवाईतून राज्यांमध्ये प्रतिबंधित असलेल्या मद्याची चोरीछुपे, वाहतूक आणि तस्करी विनाअडथळा सुरू असल्याचे सिद्ध झाले असून सध्या पथकाने संशयित चालकासह या गुन्ह्यात मद्यसाठा घेणारा व पुरवठेदार तसेच जप्त वाहनाचा मालक यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. या कारवाईत दिव आणि दमन या केंद्रशासित प्रदेशात निर्मित आणि दादरा नगर हवेली येथे विक्रीकरिता असलेले विविध ब्रॅंड चे विदेशी मद्याचे 105 बॉक्स, बोलेरो पिकअप, लाकडी भुसा असा एकूण 18 लाख 60 हजारांचा प्रतिबंधित मुद्देमाल दुय्यम निरीक्षक पी. वाय. गायकवाड, संदीप देशमुख, जवान दीपक आव्हाड, विजेंद्र चव्हाण, सागर पवार, मुस्तफा तडवी, महिला जवान अनिता भांड यांनी हस्तगत करून कारवाई केली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here