Amit Shah | सध्या सर्वच राजकीय पक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असून सर्वच पक्षांतील नेते वेगवेगळ्या दौऱ्यांमध्ये बैठकांमध्ये व्यस्त आहेत. याच अनुषंगाने आता भाजपने लोकसभेत महाराष्ट्रात मिळालेल्या कमी जागांवरून अलर्ट मोड वर येत विधानसभेसाठी विशेष पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः आगामी विधानसभा निवडणुकीत लक्ष घातल्याचे दिसून येते आहे.
Assembly Election | ‘महायुतीत 70 टक्के…’; जागा वाटपाबाबत बावनकुळे यांचे मोठे विधान
विधानसभेसाठी महाराष्ट्रात भाजप अलर्ट मोडवर
येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये रणनीती आखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दि. 25 सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघाचा आढावा घेत संघटनात्मक बैठक येणार आहेत. या बैठकीला उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आजी-माजी मंत्री तसेच बाहेरील राज्यातून आलेले प्रभारी उपस्थित राहणार आहेत.
Assembly Election | विधानसभेत वंचितचा ‘या’ पक्षाला पाठिंबा!; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या दौऱ्याचे नियोजन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे करत असून लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील 8 पैकी केवळ 2 जागांवर महायुतीला जिंकता आल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप या बैठकीत रणनीती आखणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम