Maratha vs OBC | वडीगोद्री येथे मराठा व ओबीसी आंदोलकांमध्ये राडा झाल्याची घटना घडली. ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान ओबीसी व मराठा आंदोलक आमने-सामने आले आणि जोरदार घोषणाबाजी देखील झाली. यावेळी पोलिसांकडून आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु संतप्त आंदोलकांकडून पोलिसांशीच हुजत घालण्यात आली. तेव्हा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काल रात्रीपासूनच अंतरवाली सराटीजवळ कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
अंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीचा रहदारीचा रस्ता एकच असल्यामुळे मराठा आंदोलक अंतरवाली सराटीकडे जात असताना ओबीसींकडून रस्ता रोको करण्यात आला. ज्यामुळे ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने-सामने आले. त्यामुळे सध्या वडीगोद्रीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Maratha Reservation | नाशिकमध्ये काँग्रेस नेत्यांना अडवणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल
आंदोलकांचा वडीगोद्री येथे जाण्याचा आग्रह
काही आंदोलकांनी वडीगोत्रि येथे जाण्याचा आग्रह धरल्यामुळे, मराठा आंदोलक अंतरवाली सराटीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ओबीसी आंदोलकांनी रस्ता रोको केल्यामुळे पोलीस मराठा आंदोलकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी दोन्ही गटातील आंदोलकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.
“दंगल झाल्यास फडणवीस भुजबळ जबाबदार” – मनोज जरांगे
“आम्ही वडीगावची इज्जत करतो. दादागिरी करायची नाही…तेव्हा रस्ता अडवून चालणार नाही. आंतरवालीमध्ये येणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांना ज्या रस्त्याने आले त्याच रस्त्याने जायचे आहे. काही अनुचित प्रकार घडला किंवा दंगल झाली तर याला फडणवीस आणि भुजबळ जबाबदार असतील. मराठ्यांनो भुजबळांचे ऐकू नका. मराठ्यांना शांततेत यायचे आणि शांततेत जायचे आहे. असे जरांगे पाटिल म्हणाले. त्याचबरोबर, “आग्या मोहोळ शांत होत नसते” असं म्हणत यावेळी जरांगेंनी सरकारवर टीका देखील केली.
Maratha Rally | मराठ्यांचं ‘भगवं वादळ’ उद्या नाशकात धडकणार; असा आहे रॅलीचा मार्ग
बीड जिल्हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून सकल मराठा समाजाकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा समाजाचे आंदोलक आज अंतरवाली समराटीकडे रवाना होणार आहेत. तसेच हा बंद शांततेत असणार असल्याचे मराठा समन्वयकांकडून सांगण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम