Assembly Election | विधानसभेत वंचितचा ‘या’ पक्षाला पाठिंबा!; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

0
44
#image_title

Assembly Election : सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धुमाळी असताना निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू असून वेगवेगळे दौरे, यात्रा आणि योजनांद्वारे सर्वजण मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यामध्ये पुन्हा युतीचे सरकार येणार? की जनतेतील असंतोषाचा फायदा घेत महाविकास आघाडी सत्तेची खुर्ची मिळवणार? याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Assembly Election | विधानसभा निवडणुका ‘या’ महिन्यात होणार?; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!

पण या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच नव्हे तर राज्यातील इतर पक्ष ही तितक्याच ताकतीने निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. तसेच त्यांचे टार्गेट काय असेल? किती जागांची चाचपणी सुरू आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये किती जागांसाठी चाचपणी करणार? असे विचारण्यात आले असता “चाचपणी नाही तर आम्ही एक आघाडी उभी करत आहोत, त्यातील सर्वात मोठी आघाडी ही आदिवासी समाजाची असेल. दोन वेगवेगळ्या आघाड्या मिळून एक नवी आघाडी उभी करतोय.” असे त्यांनी यावेळी सांगितले.

Assembly Election | विधानसभेमध्ये कुणाला पाठिंबा देणार याबाबतही केले स्पष्ट

लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये पूर्णपणे सहभागी झाले नव्हते परंतु त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला होता. आता विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळणार का असा सवाल विचारला असता, त्यांनी स्पष्ट नकार देत “त्यावेळेस काँग्रेसने आमच्याकडे फोन करून पाठिंबा मागितला होता. मात्र या वेळेस तसे काही नाही आमचा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही. वंचित बहुजन आघाडी आणि मित्रपक्ष एकत्र निवडणूक लढतील. आमचा त्यांनाच पाठिंबा आहे. दुसऱ्या कोणालाही नाही.” असं म्हणत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Assembly Election | योजनेनंतर मध्य प्रदेशची ‘स्ट्रॅटजी’ही ‘कॉपी पेस्ट’; महाराष्ट्रात भाजपचं ‘मिशन १२५’..?

मोठ्या नेत्यांना कोणते उमेदवार टक्कर देणार? 

विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवी, आदित्य ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे राज्यातले मोठे नेते निवडणुकीत उभे राहतील, तेव्हा त्यांच्या विरोधात वंचितचा कोणता उमेदवार उभा करणार? याबाबत विचारले असता “कोण मोठा आणि कोण छोटा हे लोक ठरवत असतात. त्या मतदारसंघात जो कोणी लढणार असेल त्याचा पूर्ण अभ्यास करून योग्य वाटणाऱ्याला आम्ही उमेदवारी देऊ. तो मोठा आहे की लहान आहे हे काही आम्ही त्यावेळी पाहणार नाही.”


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here