Anil Deshmukh | अनिल देशमुख सीबीआयच्या कचाट्यात; निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका

0
27
#image_title

Anil Deshmukh : भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्याच्या प्रकरणात अडकवण्यासाठी जळगावच्या तात्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरती पुणे येथे एक गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा महाजनांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. परंतु हा गुन्हा जळगावात दाखल व्हावा यासाठी अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना तात्कालीन जळगावचे एसीपी प्रवीण मुंडे यांना सातत्याने फोन केला होता.

Assembly Election | विधानसभेत वंचितचा ‘या’ पक्षाला पाठिंबा!; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

त्याचबरोबर गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी अनिल देशमुख कांकडून एसीपींवर दबाव टाकण्यात आला होता. असा जबाब पोलीस अधिकारी प्रवीण मुंडे यांनी सीबीआय चौकशी दरम्यान दिला. त्यामुळे सीबीआयने या प्रकरणी आता अनिल देशमुखांना आरोपी ठरवत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि इतर आरोपी देखील सामील होते.

 काय आहे नेमके प्रकरण? 

गिरीश महाजन यांना अटक करण्याच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात आता एसीपींवर दबाव टाकला म्हणून अनिल देशमुख यांना सुद्धा आरोपी ठरविण्यात आले आहे. गिरीश महाजन यांच्यावर खोटा मोक्का गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. त्यानंतर “गृहमंत्री अनिल देशमुख मला सातत्याने फोन करत होते.” असा जबाब पोलीस अधिकारी प्रवीण मुंडे यांनी दिला आहे. तर सीबीआयकडून या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे.

Assembly Election | विधानसभा निवडणुका ‘या’ महिन्यात होणार?; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!

मविआ सरकारच्या काळात गिरीश महाजनांना या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. असा खुलासा तपासाअंति समोर आला आहे. तर विधानसभेच्या काळात अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित तीन स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ सादर केले होते. तेव्हा आता निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन यांना सीबीआयकडून मोठा धक्का बसला आहे


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here