Deola | किशोर सूर्यवंशी पतसंस्थेच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षात सभासदांना आकर्षक भेट वस्तूंचे वाटप

0
36
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथील किशोर सूर्यवंशी नागरी सहकारी पतसंस्थेची २४ सावी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. ४ रोजी डॉ. दौलतराव आहेर सभागृहात, दुर्गा माता मंदिर येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न  झाली.

Deola | लोहोणेर येथील पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी उ.बा.ठा. गटाचे उपोषण

या संस्थेला पुढील वर्षी २५ वर्षे पूर्ण होत असल्याने रौप्य महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, सभासदांना आकर्षक भेट वस्तुंचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती यावेळी संचालक मंडळाने दिली.

Deola | कै. शरद जोशींची 89 वी जयंती कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणात साजरी

Deola | गुणवंत सभासद पाल्यांचा सन्मान करण्यात आला

याप्रसंगी १० वी व १२ वीत ८५% पेक्षा अधिक गुण मिळालेल्या गुणवंत सभासद पाल्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्हा. चेअरमन कौतिक पवार, मानद कार्यकारी संचालक शांताराम आहेर, संचालक सर्वश्री प्रदीप आहेर, शरद आहेर, प्रदीप डी.आहेर, डॉ. सुदर्शन निकम, डॉ. संजय निकम, भगवान पवार, रोहित चंदन, विजय मेतकर, संगीता देवरे, गीता पाटील, अर्चना वाघमारे आदींसह सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

अहवाल वाचन व्यवस्थापक प्रशांत नाखरे यांनी केले तर आभार प्रदीप आहेर यांनी मानले. सभा यशस्वीतेसाठी सचिव भालचंद्र उगले, जितेंद्र सोनवणे, सोमनाथ शिंदे, हंसराज देवरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here