Assembly Election | विधानसभा निवडणुका ‘या’ महिन्यात होणार?; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!

0
32
Eknath Shinde
Eknath Shinde

Assembly Election : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले असून सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. तसेच सर्वच पक्षांकडून आपापल्या मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. तेव्हा नेमक्या विधानसभेच्या निवडणुका कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानातून विधानसभा निवडणुक कधी होणार याबाबत संकेत दिला आहे. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर लगेचच सर्व पक्ष विधानसभेसाठी कामाला लागले. विधानसभा निवडणुका कधी पार पडणार याबाबत अजून कसलीही माहिती समोर आली नसून सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

Assembly Election | योजनेनंतर मध्य प्रदेशची ‘स्ट्रॅटजी’ही ‘कॉपी पेस्ट’; महाराष्ट्रात भाजपचं ‘मिशन १२५’..?

त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान निवडणुकांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. कांदिवली येथील मिठी नदी शेजारील विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवर असलेल्या क्रांती नगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीकरांचे एचडीएल संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. यावेळी चाव्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांबद्दल वक्तव्य केले.

Assembly Election | काय म्हणाले मुख्यमंत्री? 

चांदीवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून द्या. असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेमध्ये केले. त्याचबरोबर येत्या दोन महिन्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील. असे देखील ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी पुनर्वसन प्रकल्प लाडकी बहीण योजना याबद्दलही भाष्य केले.

Assembly Elections | विधानसभेसाठी मविआ सज्ज..!; जागा वाटपाबाबत महत्त्वाचे निर्णय

मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्याचे उद्दिष्ट

स्वतःचे घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मुंबईमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकरांनी मुंबई सोडली. त्यांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात येणार आहे. हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

त्यासोबतच, “लाडकी बहीण योजनेसाठी अजून एक महिना वाढ देण्यात आली असून लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांना सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. मी देखील शेतकरी कुटुंबातून आलो आहे. मी स्वतः चाळीत राहिलो आहे. गरिबी काय असते ते मला ठाऊक आहे. त्यामुळे गरिबांची अडचण सोडवण्याच्या कामाला मी प्राधान्य देतो. मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त व्हावे अशी वंदनीय हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. मात्र माजी मुख्यमंत्री असलेल्या त्यांच्या सुपुत्रांनी या कामाला कधीच प्राथमिकता दिली नाही. त्यामुळे आमचे सरकार आल्यावर आम्ही झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कामाला वेग दिला. असे त्यांनी सांगितले. (Assembly Election)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here