Assembly Election | योजनेनंतर मध्य प्रदेशची ‘स्ट्रॅटजी’ही ‘कॉपी पेस्ट’; महाराष्ट्रात भाजपचं ‘मिशन १२५’..?

0
33

Assembly Election : राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र विविध पक्षांकडून आपल्या मतदारसंघांची चाचणी केली जात असून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे जागावाटप आणि या निवडणुकीसाठी कोणते नवीन पैत्रे वापरण्यात येणार आहेत यासाठी सर्वच पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप ही विधानसभा निवडणूक कोणत्या नव्या फॉर्म्युलावर लढवणार याची माहिती समोर आली आहे.

Assembly Elections | विधानसभेसाठी मविआ सज्ज..!; जागा वाटपाबाबत महत्त्वाचे निर्णय

125 जागांचं गणित काय? 

विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी मुंबई येथे भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये भाजप किती जागांवर निवडणूक लढवणार याबाबत चर्चा करण्यात आली तसेच कोणत्या जागांवरती विजय निश्चित आहे याबद्दलही बोलले गेले यावेळी भाजप 125 जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली असून यातील 50 जागांवर भाजपाचा विजय निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मध्य प्रदेश फॉर्मुला वापरणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Nashik News | नाशकात काँग्रेसचा भव्य मेळावा; पण मेळाव्यात एकुलत्या एक आमदारालाच स्थान नाही..?

उरलेल्या 75 जागांसाठी काय रणनीती आखणार? 

भाजपकडून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मध्यप्रदेश पॅटर्न राबवण्यात येणार असून 125 जागा लढवण्यात येणार आहेत. त्यातील 50 जागांवरती भाजपाला विजयाची खात्री आहे. तर उर्वरित 75 जागांसाठी वेगळी रणनीती आखणार असल्याचे बोलले जात आहे. या 75 जागांपैकी ज्या जागा, ज्या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्याला मतदार संघाची जबाबदारी दिली जाणार असल्याचा अहवाल भाजपाच्या राज्यातील आणि केंद्रातील वरिष्ठांना दिला जाणाआहे. तसेच दिल्या गेलेल्या जबाबदारीत जे काही मतदारसंघ असतील त्यामध्ये तो नेता ग्राउंड लेव्हल वर काम करणार असून सामान्य मतदारांपासून पदाधिकाऱ्यापर्यंत एकत्र बांधणी करायची असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर मतदार संघाची जमेची बाजू कोणती आहे हे हेरून ज्या काही कमतरता आहेत यावर चर्चा केली जाणार असून त्याचाही अहवाल राज्यातील भाजप वरिष्ठांना दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशाप्रकारे भाजपाने उर्वरित 75 जागांसाठी वेगळे रणनीती आखली असल्याचे पहायला मिळत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here