Nashik Crime | सिन्नर तालुका हादरला; 3 शाळकरी मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न

0
104
#image_title

Nashik Crime | नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंपळे येथे तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता संशयित आरोपीला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

Nashik Crime | बडगुजरांचा मुलगा फरार; ‘त्या’ प्रकरणी मुलाला अटक होणार…?

विहिरीत कासव आहेत सांगत दिले ढकलून

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून संशयित आरोपी अमोल लांडगे यांनी शेजारच्या विहिरीत कासव असल्याचे सांगत तीन अल्पवयीन मुलांना विहिरीत ढकलून दिले. त्यांच्यापैकी एकाने विहिरीतील दोरीला पकडून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला व इतर दोघांचा जीव वाचवला. संशयित अमोल लांडगे बरोबर विक्रम माळी आणि साईनाथ ठमके हे देखील या घटनेत सहभागी होते.

Nashik Crime | नाशकात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

या धक्कादायक प्रसंगातून वाचून घरी आल्यानंतर तीनही शाळकरी मुलांनी आई-वडिलांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सिन्नर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लगेचच तपास सुरू केला असून अमोल लांडगे या संशयीताला ताब्यात घेतले आहे. या संबंधित अधिकचा तपास सुरू असून तिघा शाळकरी मुलांना जिवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत लोटून देण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here