Nashik Crime | धक्कादायक!; नाशकात अटकेची भीती घालत भामट्यांनी लाखो लुबाडले

0
53
#image_title

Nashik Crime | नाशिक शहरातील काही नागरिकांबरोबर सायबर फसवणूक झाली असून या भामट्यांनी नागरिकांना संपर्क साधून शहर मार्केट मधून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत व हाऊस अरेस्ट करण्याची भीती घालत सुमारे 70 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी आता सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Nashik Crime | बडगुजरांचा मुलगा फरार; ‘त्या’ प्रकरणी मुलाला अटक होणार…?

वृद्ध महिलेचे 23 लाख रुपये लुबाडले 

द्वारका येथील 59 वर्षीय वृद्ध महिलेस भामट्यांनी 13 सप्टेंबरला 23 लाख रुपयांचा गंडा घातला. दिल्ली पोलीस सीबीआय ट्रायमधून बोलत असल्याचे भासवून भीती घातली व मनी लॉन्ड्रींग केसमध्ये सहभागी असल्याचे सांगत अटक करण्याची भीती घालून 23 लाख रुपये ऑनलाईन देण्यास भाग पाडले. या प्रकरणी वृद्ध महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Nashik Crime | सिन्नर तालुका हादरला; 3 शाळकरी मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न

इतर पाच जणांकडूनही लाखो रुपये बळकावले

तर याच प्रमाणे गंगापूर रोडवरील महिला डॉक्टर व इतर चौघांना 46,47,348 रुपयांचा गंडा घातला. 22 नोव्हेंबर 2023 ते 26 जुलै दरम्यान शेअर मार्केट मधून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत 5 जणांकडून लाखो रुपये बळकावले. गोपनीय शाखेचे पोलीस आहोत असे सांगत महिलेचे आधार कार्ड मिळवले. त्यावरील आधार नंबर सांग त्यावरून तुमचे आर्थिक व्यवहार संशयास्पद आढळले आहेत.

तसेच या आधार कार्डचा वेगवेगळ्या बँक खात्यातून तुम्ही मनीलॉंड्रिंग केले आहे. त्यामुळे तुमच्यावर कारवाई करीत आहे. तसेच तुमच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. ईडी सीबीआयचा सही शिक्का लोगो असलेली कागदपत्रे आणि अटक वॉरंट दाखवत विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे महिलेने दबावाखाली येऊन भामटे सांगतील त्याप्रमाणे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी महिलेला विविध बॅंकेमध्ये वेगवेगळ्या बँक खात्यात रक्कम भरण्यासाठी भाग पाडले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here