सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या देवळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून राजेश कदम यांनी बुधवार (दि.१८) आपला पदभार सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांच्याकडून स्वीकारला. नूतन गटविकास अधिकारी कदम हे शेवगांव जि. अहिल्यानगर येथून बदली होऊन आले आहेत.
Deola | चिंचवे (नि.) विकास सोसायटीच्या चेअरमन पदी प्रकाश पवार यांची बिनविरोध निवड
पंचायत समितीकडून गटविकास अधिकाऱ्यांचे स्वागत
यावेळी नवीन आलेल्या गटविकास अधिकारी यांचे स्वागत पंचायत समितीच्या प्रशासनाकडून करण्यात आले. याप्रसंगी बांधकाम उपअभियंता राजेंद्र चव्हाण, रवींद्र बाविस्कर, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, सामान्य प्रशासनधिकारी नानासाहेब पवार, राजेश वाघेरे, शामकांत पाटील, विस्तारधिकारी देवीप्रसाद मांडवडे, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र झालटे, योगेश पगार, संभाजी देवरे, जगन्नाथ शिंदे ,नंदू सोनवणे, निंबा सूर्यवंशी, विजय देवरे, एकनाथ गावित, विजय सोळसे, आदींसह तुषार थोरात, महेश भामरे, पांडव ठाकरे, मनोज साळी, ललित जाधव आदींसह सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामसेवक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम