Nashik Crime | दहशतवादी विरोधी पथकाने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कुख्यात गॅंगस्टर अब्बू सालेमला भेटायला आलेल्या त्याच्या खास मैत्रिणीसह आणखी एकाची चौकशी सुरू केली असून यात सालेमला भेटण्यामागचे कारण उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Nashik Crime | नाशकात सायबर भामट्यांचा वृद्धाला 20 लाखांचा गंडा
अबू सालामला भेटायला आलेली मैत्रीण एटीएसच्या ताब्यात
मुंबईमध्ये 1993 साली साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी गँगस्टर अबू सालेम हा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गुरुवार दि. 10 ऑक्टोबर रोजी त्याला भेटण्यासाठी त्याची मैत्रीण कारागृहात आल्याचे दहशतवाद विरोधी पथकास समजताच त्यांनी तातडीने त्याच्या मैत्रिणीसह एका व्यक्तीस चौकशीसाठी ताब्यात घेतले असून यावेळी शहर पोलिसांसह राज्य गुप्तचर विभागाचे पथक देखील उपस्थित होते.
Nashik Crime | चांदवडमध्ये बापाकडूनच पोटच्या गोळ्याला मारहाण
एटीसकडून दोघांचीही कसून चौकशी
दरम्यान, पथकाकडून केलेल्या सखोल चौकशी ताब्यात घेतलेला दुसरा व्यक्ती हा दुसऱ्या कैद्यास भेटण्यासाठी आल्याचे समोर आले. मात्र, एटीएसने त्याची देखील सखोल चौकशी केली. तसेच सालेमच्या मैत्रिणीची देखील गुप्तचर विभागाच्या 6 अधिकाऱ्यांनी सायंकाळपर्यंत चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली असून चौकशीत सालेमला भेटण्याचा हेतू, तिचा भूतकाळ, सालेम सोबत तिची मैत्री कशी झाली? यासह इतर प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न एटीएस केला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम