Crime News | महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या विकृताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

0
66
Nashik Crime
Nashik Crime

Crime News | सरकारवाडा पोलिसांनी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनी समोर विकृत कृत्य करणाऱ्या संशयिताला पकडले असून पवन वैजनाथ प्रजापती याच्या विरोधात आता पोक्सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात करण्यात आला आहे.

Nashik Crime | गॅंगस्टर अबू सालेमला भेटायला आलेल्या दोघा जणांची एटीएसकडून कसून चौकशी

नेमके काय घडले? 

मागच्या आठवड्यात गंगापूर रोड येथील, केबीटी सर्कल परिसरात विनयभंगाचा प्रकार घडला. दररोज प्रमाणे सकाळी 7 ते 8 च्या सुमारास विद्यार्थिनी महाविद्यालयात शिकवणीला जात असताना, दुचाकीवरून आलेल्या विकृत संशयितानं मुलींसमोर थांबून अश्लील कृत्य केले. ज्यामुळे विद्यार्थिनी घाबरल्या व त्याकडे दुर्लक्ष करीत पुढे गेल्या. यावेळी संशयिताच्या दुचाकीचा क्रमांक लक्षात ठेवत, त्यानंतर पीडितांनी ही बाब क्लासच्या शिक्षकांना सांगितली. पुढे तपास करताना असाच प्रकार इतर 2 मुलींबरोबरही घडल्याचे उघडकीस आले. ज्यामुळे नंतर मुलींच्या पालकांसह शिक्षकांनी सरकारवाडा पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पीडीतांनी दिलेल्या एम. एच. 15 जे. पी. 0661 या दुचाकी स्वाराचा शोध घेतला असून त्यानुसार, संशयित पवन प्रजापतीला पकडण्यात आले आहे व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime | नाशकात सायबर भामट्यांचा वृद्धाला 20 लाखांचा गंडा

घटना सीसीटीव्ही कैद

पोलिसांच्या माहितीनुसार, पवनविरोधात यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून तो सातपूर परिसरात फळ,भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. सकाळी माल खरेदीसाठी जाण्याच्या बहनाने गंगापूररोड मार्गे जाताना त्याने विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य केले व पसार झाला असल्याचे परिसरातील काही सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here