Deola | खर्डे येथे अटल भूजल योजनेचे ग्रामस्तरावर प्रशिक्षण संपन्न

0
55
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यातील खर्डे येथे “यशदा” पुणेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अटल भूजल यॊजनॆचे ग्रामस्तरावरील प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणात शेतकरी उत्पादक कंपनी, शेतमाल उत्पादन आणि बाजरपेठेशी जोडणी, सामूहिक शेती, शेतकरी गट, शेतकऱ्यांची कंपनी, त्यांचे फायदे, त्यासाठी लागणारी नियमावली भविष्यात पुढील काळात शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सामूहिक शेती कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार याविषयी प्रशिक्षक स्मिता बहादुरे, सरला सोनवणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Crime News | महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या विकृताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित

यावेळी सरपंच जिभाऊ मोहन, उपसरपंच सुनील जाधव माजी उपसरपंच राहुल देवरे, पोलीस पाटील भारत जगताप, समाधान देवरे, साहेबराव देवरे, विठोबा देवरे, हर्षद मोरे, केवळ जाधव, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल मोरे, अशोक सोळसे आदींसह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here