Nashik Crime | नाशकात सायबर भामट्यांचा वृद्धाला 20 लाखांचा गंडा

0
39

Nashik Crime | नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून वारंवार सायबर गुन्ह्यांची नोंद होत असून आता सायबर भामट्यांनी एका वृद्धाला ईडी कार्यालयातून बोलत असल्याचे भासवत 20 लाख रुपये उकळले आहेत. तर दुसऱ्या घटनेत सातपूर (जळगाव) येथे दोघांनी गुंतवणूकदाराला योजनेतील जादा परताव्याचे आमिष दाखवत 5 लाख रुपयांचा गंडा घातला. या दोन्ही प्रकरणांमध्ये सायबर व सातपूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime | चांदवडमध्ये बापाकडूनच पोटच्या गोळ्याला मारहाण

मनी लॉन्ड्रींगप्रकरणी अटकेची भीती घालत उकळले पैसे

शहरातील 71 वर्ष वृद्धाला सायबर चोरट्यांनी एक ते चार ऑक्टोबर या कालावधीत मो.क्रं. 9278550972 व व्हॉट्सॲप क्र. 9957024158 यावरून चॅटिंग व कॉल करत संपर्क साधला. फोनवरती “मी प्रदीप सावंत, अंधेरी पोलीस स्टेशन मधून बोलत आहे.” असे सांगत, “तुमच्या नरेश गोयल नावाच्या मोबाईल क्रमांकावरून मनी लॉन्ड्रीचे व्यवहार झाले आहेत. हे संशयास्पद असून तुमचा आतापर्यंतचा आर्थिक तपशील, स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती पोलीसासमवेत सक्षम सादर करावी.” असे सांगितले. “तेव्हा तुम्ही आमच्या ईडी कार्यालयातील मॅडम सोबत बोलून घ्या.” असे सांगत, बोगस पोलीस अधिकारी आकांक्षा अग्रवाल हिने वृद्धाला “तुमचे मनी लॉन्ड्रीचे व्यवहार समोर आले असून कारवाई होईल, अटक केली जाईल. त्यामुळे आम्ही जे सांगू ते करा.” अशी भीती घातली. त्यानंतर अन्य संशयितांनी वृद्धाला फोनवरून प्रकरणातून सुटका करून घ्यायची असेल, तर आम्ही सांगितलेल्या बँक खात्यात 20 लाख 11 हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. त्यानंतर आपली फसवणूक येतात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक ढवळे पुढील तपास करीत आहेत.

Nashik Crime | नाशकात परदेशातील गांजाची सर्रास विक्री; पोलिसांची सापळा रचत कारवाई

ज्यादा परताव्याचे अमिश दाखवत केली फसवणूक

तर जळगाव येथे राहणारे किरण गुलाब निकुंभ यांना संशयित मयूर कैलास राठोड आणि दिनेश गिरिधर वाघमारे (रा. नाशिक) यांनी ट्रेडिंगचे आमिष दाखवत जादा आर्थिक परताव्याची हमी देत 15 ते 26 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये यांना बिनामो या ट्रेडींग ॲप वर पैसे भरण्यास सांगितले. हे पैसे गुंतवण्याचा बहाणा करत त्याच्या फोन पे, यूपीआयने पेटीएम वर रोख 5 लाख 3 हजार रुपये वेळोवेळी घेत पैशांचा परतावा न देता या रकमेचा अपहार करून फसवणूक केली. याप्रकरणी उपनिरीक्षक बटुळे पुढील तपास करीत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here