Nashik Crime | चांदवडमध्ये निष्ठुर बापाने आपल्या सहा वर्षीय मुलाला दोरीने उलटे टांगत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेम प्रकरणातून पत्नीला मारहाण करत असताना सहा वर्षीय चिमूरडा आईजवळ आल्याच्या रागातून बापाने चिमूरड्याला मारहाण केली. एवढेच काय तर निष्ठुराने आपल्या पोटच्या गोळ्याला दोरीच्या सहाय्याने घराच्या छताला उलटे टांगले होते. याप्रकरणी पत्नी सुनीता बेंडकुळे यांनी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पती मंगेश केदू बेंडकुळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Nashik Crime | नाशकात परदेशातील गांजाची सर्रास विक्री; पोलिसांची सापळा रचत कारवाई
प्रेम प्रकरणातून पत्नीला मारहाण
सुनीता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगेश याचे बाहेर कोणाशी तरी प्रेम संबंध असून त्यावरून तो वाद घालत सुनिता यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत असताना मुलगा निलेश याने आईकडे धाव घेतली त्याचा राग धरत संशयित आरोपीने मुलाला मारहाण केली. त्यानंतर दोरीच्या साह्याने मुलाला घराच्या छतावर पाईपला दहा ते पंधरा मिनिटे उलटे टांगले होते. एवढेच काय तर मंगेशने सासरच्या मंडळींना देखील शिवीगाळ केली व पत्नीला घर सोड नाहीतर जीवे मारीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नोंदविले आहे. वडनेरभैरव पोलिसांना या घटनेची माहिती लागताच त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले असून याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे अधिक तपास करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम