Nashik Crime | अमली पदार्थांच्या वाहतुकीत तुमचा सहभाग असल्याचे भासवत सायबर भामट्यांनी महिलेला सुमारे साडेतीन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. ऑनलाइन अटक केल्याचे सांगत कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची धमकी देत 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
Nashik Crime | नाशिकमध्ये हद्दपार गुंडाची दहशत; कोयत्याच्या धाकावर दुकानदाराकडे खंडणीची मागणी
भामट्यांकडून महिलेला व्हाट्सॲप वरून संपर्क साधत कुरियर कंपनीतून तसेच मुंबई सायबर पोलीस बोलत असल्याचे भासवण्यात आले. त्यानंतर तुमच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये 200 ग्रॅम अमली पदार्थ पाच पासपोर्ट, तीन एटीएम कार्ड व इतर वस्तू आढळून आल्याचे महिलेला सांगण्यात आले. तसेच तुमची चौकशी केली जात असून तुमच्या बँक खात्यातून मनी लॉन्ड्रीचे व्यवहारही केले गेले असून तुमच्या नावे अटक वॉरंट काढल्याचे महिलेला सांगण्यात आले त्याची नोटीस व्हाट्सअप वरच पाठवत तुमच्यावर पोलिसांचे लक्ष आहे असे सांगण्यात आले.
कटुंबाच्या जीवाला धोका असल्याची भीती घातली
त्याचप्रमाणे, मनी लॉंडरिंग केल्यामुळे तुमच्या व तुमच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत महिलेला दर तासाला मेसेज करून महिलेला व्हर्च्युअल अटक केल्याचे भासवण्यात आले व कारवाईबाबत गुप्तता बाळगण्याचा इशाराही देण्यात आला. ज्यामुळे महिलेने ही बाब कोणालाही सांगितली नाही. अशाप्रकारे भामट्यांनी ऑनलाइन पद्धतीने महिलेकडून 3 लाख 36 हजार 793 रुपये उकळले.
Nashik Crime | खळबळजनक!; चांदवडमध्ये क्लास चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शेवटी, फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यानंतर, सायबर पोलीस ठाण्यात महिलेशी संपर्क साधणाऱ्यांसह व्हाट्सअपधारक, ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्या खातेदारकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम