Nashik | चोरीची तक्रार करण्याकरिता आलेल्या फिर्यादीस भद्रकाली पोलीस ठाण्यातील अंमलदाराकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित अंमलदारास निलंबित केले असून पोलीस हवालदार योगेश जालिंदर ढामले असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. बॅग चोरीची तक्रार करण्याकरिता आलेल्या फिर्यादीला पोलीसांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने पोलीस आयुक्तालयात धाव घेतल्यानंतर तक्रारीची शहानिशा करून ढमाले विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Nashik News | इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात बुडून युवकाचा मृत्यू
पोलिसाकडून तक्रारदारास मारहाण
सोलापुरातील रहिवासी संतोष बालाजी गंजी हे धार्मिक विधीसाठी नाशिकमध्ये आले असता 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास शालिमार येथे त्यांची बॅग चोरीला गेली. त्यावेळी ठाणे अंमलदार योगेश ढमाले हे ड्युटीवर होते. संतोष यांनी आपली बॅग चोरी झाल्याची तक्रार ढमालेकडे केली असता, त्यावेळी ढमाले याने “तुम्ही पुन्हा शालिमार येथे थांबा, पोलीस येतील तपासणी करतील.” असे सांगितले. मात्र दोन तास उलटूनही पोलीस न आल्याने संतोष यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावेळी ढमाले हे पोलीस ठाण्याबाहेर झाडाखाली उभे होते. आपली मदत करण्यासाठी कोणीही न आल्याचे तक्रारदाराने सांगताच. “तुझी बॅग सापडणार नाही” असे म्हणत, संतोष यांना मारहाण केली. त्यानंतर, संतोष यांनी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष गाठले आणि ढमालीन विरोधात तक्रार नोंदवली.
तक्रारदाराची पोलीस आयुक्तालयात धाव
त्यानंतर, भद्रकाली पोलिसांना संतोष यांची तक्रार नोंदविण्याचा सूचना देण्यात आल्या. परंतु सीसीटीव्ही तपासणीचे कारण देत पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास विलंब केला. त्यामुळे वैतागलेल्या संतोष यांनी “तक्रार द्यायची नाही.” असे सांगितले. 30 सप्टेंबरला संतोष यांनी पंचवटीत धार्मिक विधी पूर्ण करून पुन्हा पोलीस आयुक्तालयात गाठत पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी संतोष यांच्या तक्रारीची पडताळणी करून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सदर प्रकार सांगितला. अंमलदार ढमाले याने शिस्त पालन न करता कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी तातडीने त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
Nashik News | नाशकात म्हाडाच्या राखीव सदनिकांची अधिकाऱ्यांकडून विल्हेवाट
पोलीस आयुक्तांकडून टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना इशारा
शहरामध्ये मोबाईल, वाहन, बॅंकेत चोरी झाल्यानंतर तक्रारदारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याची तक्रार अनेक वर्षांपासून आहे. संबंधित वस्तू सापडल्यास ती तातडीने तक्रारदारास मिळावी यासाठी तक्रार दाखल करत नसल्याचा दावा तक्रारदारांकडून केला जातो. अनेकता वस्तू सापडल्यानंतर गुन्हा दाखल केला जात असल्याचेही प्रकार समोर आले आहेत. तक्रारदारांना समजावून सांगण्याऐवजी त्यांना उडवा उडवीची उत्तरे देत घरी पाठवले जाते. हाच प्रकार भद्रकाली पोलीस ठाण्यातही घडल्याचे उघड झाले असून त्यामुळे ही निलंबनाची कार्यवाही करत, तक्रार दाखल करून न घेणाऱ्या पोलिसांना आयुक्तांनी एक प्रकारे इशारा दिल्याच्या चर्चा आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम